News

आकाराने लहान आणि स्वादिष्ट थोडे आंबट रेड लव प्रजातीचे सफरचंद आणि सिमला बाजारपेठेत फार मोठी झेप घेतली आहे. हे सफरचंद बाजारात पाचशे रुपये प्रति किलो विकले गेले आहे.तसेच हा भाव या प्रजातीचा रेकॉर्डब्रेक भाव आहे.

Updated on 29 August, 2021 9:43 AM IST

 आकाराने लहान आणि स्वादिष्ट थोडे आंबट रेड लव प्रजातीचे सफरचंद आणि सिमला बाजारपेठेत फार मोठी झेप घेतली आहे. हे सफरचंद बाजारात पाचशे रुपये प्रति किलो विकले गेले आहे.तसेच हा भाव या प्रजातीचा रेकॉर्डब्रेक भाव आहे.

 शिमला जिल्ह्यातील रोहडू येथील स्वीट ऑर्चर्ड बराल त्यातील रेड लव सफरचंदाचे अर्धा किलो ची पॅकिंग सोलन येथील बाजारपेठेत 250 रुपये दराने खरेदी केली गेली. हे अर्धा किलो ची पॅकिंग सफरचंद उत्पादकांकडून प्रायोगिक तत्त्वावर बाजारात आणली गेली. हे सफरचंद आकाराने लहान आणि चवित  थोडे आंबट असल्याने तसेच आरोग्यवर्धक असल्यामुळे या सफरचंदाला रेकॉर्ड ब्रेक भाव मिळाला.

यादरम्यान सोलन येथील खरेदीदार यांनी सफरचंद उत्पादकांना अर्धा किलोचे पॅकिंग साठी ट्रे वाले बॉक्स उपलब्ध करण्याचा प्रस्ताव दिला आहे. विदेशात सगळे फळे अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये विकले जातात.

 हिमालयन सोसायटी फोर हॉर्टीकल्चर अँडऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट हिमाचल चे अध्यक्ष डिंपल पांजटा यांनी सांगितले की, ज्यूस आणि रेड वाइन बनवण्यासाठी रेड लव्ह सफरचंदाची मार्केटमध्ये भारी मागणी आहे. सोलन येथील व्यापाऱ्यांनी पाचशे रुपये किलो या दराने हे सफरचंद खरेदी केले आहे. या जबर संताच्या प्रजातीला प्रसाद करण्यासाठी तसेच मार्केट उपलब्ध करण्यासाठी सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. पुढे बोलताना पांजटा म्हणाले की, फळ बागायतदारांना रेड लव सफरचंदाची कलमे मोफत  उपलब्ध करणार आहेत.

 रेड लव सफरचंद ही स्वित्झर्लंड ची व्हरायटी आहे. या प्रजातीच्या झाडाच्या फांदया, पाणी आणि फुले हि लाल  रंगाचे असतात.त्याचा आकार लहान असतो आणिखाताना आहे थोडे आंबट असते.

परदेशात याचा वापर  रेड वाइन बनवण्यासाठी केला जातो. तसेच रेड लव सफरचंदामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी ची मात्रा भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ते आरोग्या वर्धक आहे. खासकरून मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक रामबाण आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त अशी ही एक सफरचंदाची एकमेव प्रजाती आहे. रेड लव सफरचंदाचा ज्युस चा रंग लाल असतो.तसेच या  सफरचंदाला चंडीगड,दिल्ली आणि मुंबई येथे मोठी मागणी आहे. रेड लव्ह सफरचंद आरोग्यवर्धक असल्याने लोकांमध्ये याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

English Summary: in simla red love apple sell of recordbreak price
Published on: 29 August 2021, 09:43 IST