News

सांगली बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या हळद सौद्या मध्ये राजापुरी हळदीला अठरा हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. बावची येथील विजयकुमार चव्हाण यांची ही हळद होती. यावर्षी हळदीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून आनंद आणि समाधान व्यक्त केले जात आहे

Updated on 07 January, 2022 8:52 AM IST

सांगली बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या हळद सौद्या  मध्ये राजापुरी हळदीला अठरा हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. बावची येथील विजयकुमार चव्हाण यांची ही हळद होती. यावर्षी हळदीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून आनंद आणि समाधान व्यक्त केले जात आहे

सांगली बाजार समिती चा विचार केला तर हळदीची आवक आणि जावक चांगले आहे.बुधवारीझालेल्या हळद विक्रीमध्ये वाळवा तालुक्यातील बावची येथील शेतकरी विजय चव्हाण या शेतकऱ्यांच्या हळदीला बुधवारी झालेल्या सौद्यात एका क्विंटलला 18 हजार रुपयांचा दर मिळाला.

 जर हे सगळ भावाचे सरासरी पाहिली तर क्विंटलला कमीत कमी सहा हजार आणि जास्तीत जास्त 18000 व सरासरी बारा हजार रुपयाचा भाव मिळाला आहे.

 सांगली बाजार समितीमध्ये हळद खरेदीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात व्यापार येत आहेत त्यामुळे हळदीला चांगला भाव मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू शकणार आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या हळद जास्तीत जास्त विक्री साठी बाजार समितीमध्ये घेऊन यावी अशा आशयाच्या आव्हान सभापती दिनकर पाटील तसेच सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे. 

तसेच चालु हळदीवर आणि बेदाणा या शेतमालावर शासनाची तारण कर्ज योजना ही सुरु आहे, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे दिनकर पाटील यांनी यावेळी सांगितले.(संदर्भ-हॅलोकृषी)

English Summary: in sangli market comitee get a high rate to rajapuri turmuric
Published on: 07 January 2022, 08:52 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)