News

पुणे : राज्यासह देशातील अनेक ठिकाणी डिजिटल कामे होत आहेत. सध्या कोरोनाचे थैमान असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. जनसंपर्क अधिक होऊ नये म्हणून सर्व कामे मानवरहित करण्यात येत आहेत. शाळेपासून ते सात बारा दाखला मिळवण्याचे कामेही ऑनलाईन केले जात आहेत,

Updated on 31 July, 2020 6:20 PM IST


पुणे  : राज्यासह देशातील अनेक ठिकाणी डिजिटल कामे होत आहेत. सध्या कोरोनाचे थैमान असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. जनसंपर्क अधिक होऊ नये म्हणून सर्व कामे मानवरहित करण्यात येत आहेत. शाळेपासून ते सात बारा दाखला मिळवण्याचे कामेही ऑनलाईन केले जात आहेत, पण मात्र पुरेशा लोकांकडे इंटरनेटची सेवा नसल्याने ऑनलाईनची कामे करताना नागरिकांना अडचणी येत आहेत.

याविषयीचे  नॅशनल सॅम्पलने एक सर्व्हे  केला आहे, यात धक्कादायक बाब समोर आली आहे.  आघाडीचे राज्य असलेल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फक्त १८.५ %   घरांमध्ये इंटरनेट सुविधा आहे. देशात ऑनलाईन कृषीमाल खरेदी विक्रीचे काम चालू आहेत, पण इंटरनेट सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना ऑनलाईनची कामे करण्यास अडचणी येत आहेत.

 नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या २०१७- १८ च्या अहवालानुसार केवळ १८.५ % घरांमध्ये इंटरनेट सुविधा असल्याचे चित्र आहे. त्यातही केवळ सहा लोकांमागे केवळ एकाला इंटरनेट वापरता येते. त्यामुळे ग्रामीण भागात शेती आणि सध्या ह्या काळात  चालू असलेले ऑनलाईन शिक्षण या सांगा ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल सरकारला आरसा दाखवणारा आहे. सरकारने  ऑनलाईन मंडई, ऑनलाईन  शेती सुविधा यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे देणार आहे. परंतु ग्रामीण महाराष्ट्र त्यासाठी तयार नसल्याचे आपल्याला या सर्व्हेच्या माध्यमातून दिसत आहे.

English Summary: In rural Maharashtra only 18.5% of people having access to the Internet
Published on: 31 July 2020, 06:19 IST