News

रामगड दौसा येथील येथील एका कर्जबाजारी शेतकर्यांेच्या जमिनी ची जप्ती करून बँकेने मंगळवारी त्या जमिनीचा लिलाव केला. त्यामुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कारण असे आहे की या शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव झाला ते शेतकरी कुटुंबदौसा जिल्ह्यातील रामगड पचवाडा येथील आहेत.

Updated on 19 January, 2022 10:34 AM IST

रामगड दौसा येथील येथील एका कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या जमिनी ची जप्ती करून बँकेने मंगळवारी त्या  जमिनीचा लिलाव केला. त्यामुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कारण असे आहे की या शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव झाला ते शेतकरी कुटुंबदौसा जिल्ह्यातील रामगड पचवाडायेथील आहेत.

 या संबंधीत शेतकऱ्याने रामगड पचवाडा येथील राजस्थान मरुधरा ग्रामीण बँकेतून किसान क्रेडिट कार्ड चे कर्ज घेतले होते. 2017 नंतर संबंधित शेतकऱ्यांनी त्याच्यावर असलेल्या सात लाख पेक्षा जास्त कर्जाची परतफेड केली नाही. ज्या शेतकऱ्यांनी हे कर्ज घेतले होते त्या कर्जदार शेतकऱ्याचा ही मृत्यू झाला.त्यानंतर या बँकेनेमृत पावलेल्या या शेतकऱ्यांची मुले राजूलाल आणि पप्पू लाल यांना पैसे भरावे यासाठीच्या नोटिसा दिल्या.परंतु संबंधित कुटुंबाचे आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने आणि संबंधित कुटुंबाला शासनाकडून कर्ज माफी ची प्रतीक्षा असल्याने हे कुटुंब पैसे भरू शकले नाहीत. शेवटी या कुटुंबाची जमीन रामगड पचवाडा एसडीएम कार्यालयाने जप्त करण्याचे आदेश दिले.

 कर्ज होते 7लाखआणि जमिनीचा लिलाव झाला 46 लाख 51 हजार रुपयात……

 जमीन जप्तीचे आदेश दिल्यानंतर ही शेतकरी कुटुंबाकडे पैसे जमा करण्यासाठी रक्कम नव्हती.त्यानंतर जमीन जप्त केल्यानंतर मंगळवारी लिलाव करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.  या शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव करण्यात आला आणि या जमिनीचा लिलाव शेचाळीस लाख 51 हजारांना झाला. ही जमीन किरण शर्मा  रा. मंदावरी यांनी लिलावात खरेदी केली. शेतकरी हे आपल्या जमिनीला आई मानतात आणि अशा स्थितीत  संबंधित शेतकऱ्यांच्या जमिनी चा लिलाव झाला तेव्हा या शेतकरी कुटुंबाची अवस्था काय झाले असेल याचा अंदाज बांधणे सुद्धा कठीण आहे.

शेतकरी कुटुंबाची अवस्था बिकट होती. आता जायचे कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांचे कुटुंब विचारत होतं.प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की पक्ष मोठमोठीआश्वासने देतात.आश्वासने पूर्ण करण्याची घोषणाही करतात परंतु परिस्थिती प्रत्यक्षात खूप वेगळी असते. राजस्थान मधील काँग्रेस सरकार कर्जमाफी चे आश्वासन देऊन सत्तेवर आले आहे. परंतु तीन वर्षे झाली तरीही त्यांनी ते आश्वासन पूर्ण केले नाही असा आरोप भाजपने केला आहे. आजही राजस्थान मधील मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफी च्या प्रतीक्षेत आहेत.

(सौजन्य-लोकमत)

English Summary: in rajasthan farmer seize his land by bank due to bank debt pending
Published on: 19 January 2022, 10:34 IST