News

भारतात सर्वत्र कांदा लागवड (Onion planting) बघायला मिळते, महाराष्ट्रात पश्चिम भागात कांदा लागवड विशेष उल्लेखनीय आहे. या भागातील नाशिक जिल्यातील बहुतांशी शेतकरी कांदा पिकावर अवलंबून (Depending on the onion crop) आहेत, या प्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी देखील कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. आता खरीप हंगामातील लाल कांदा अंतिम चरणात असून अनेक शेतकरी लाल कांद्याची काढणी करताना दिसत आहेत, राज्यात आता खरीप हंगामातील लाल कांद्याची काढणी जोर पकडू लागली आहे, राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीत (In the Agricultural Produce Market Committee) लाल कांद्याची मोठी आवक बघायला मिळत आहे.

Updated on 03 January, 2022 3:59 PM IST

अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील कांद्याची मोठी आवक नजरेला पडली. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की नगर जिल्ह्यातील ही एक प्रमुख बाजारपेठ (Market) आहे. आणि आजूबाजूच्या शेकडो शेतकऱ्यांसाठी ही बाजारपेठ महत्त्वाची आहे. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत आता लाल कांद्याची भली मोठी आवक दिसत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 2818 गोणी कांद्याची आवक झाली आहे. तसेच या बाजार समितीत लाल कांद्याला 2700 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला आहे.

जाणुन घ्या राहता मार्केटचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो राहाता बाजार समितीत एक नंबर कांद्याला 2300 ते 2700 प्रतिक्विंटल या दरम्यान दर मिळाला आहे. दोन नंबर कांद्याला 1400 ते 2300 प्रति क्विंटल या दरम्यान बाजारभाव मिळाला आहे. तीन नंबर कांद्याला 500 ते 1350 प्रति क्विंटल या दरम्यान बाजारभाव (Market price) मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत गोल्टीला देखील बऱ्यापैकी दर मिळताना दिसत आहे, गोल्टी कांद्याला 1800 ते 2000 प्रति क्विंटल यादरम्यान दर प्राप्त झाला आहे. बेले कांद्याला 100 ते 400 रुपये प्रति क्विंटल यादरम्यान बाजारभाव प्राप्त झाला आहे.

English Summary: in rahta market committee onion incoming is growing learn about it
Published on: 03 January 2022, 03:59 IST