News

सध्या फळांचा राजा हापूस आंबा सध्या बाजारपेठेत मोठ्या थाटात दाखल होत आहे. पावस येथे अमृता मॅंगोज यांनी प्रत्यक्ष आंब्याच्या बागेत जाऊन प्रत्यक्ष लिलाव करून मुहूर्ताची आंब्याची पेटी चक्क 25 हजार रुपयांना खरेदी केली.

Updated on 12 February, 2022 9:00 AM IST

सध्या फळांचा राजा हापूस आंबा सध्या बाजारपेठेत मोठ्या थाटात दाखल होत आहे. पावस येथे अमृता मॅंगोज यांनी प्रत्यक्ष आंब्याच्या बागेत जाऊन प्रत्यक्ष लिलाव करून मुहूर्ताची आंब्याची पेटी चक्क 25 हजार रुपयांना खरेदी केली.

अमृता मॅंगोजतर्फे अभिजित पाटील यांनी लिलाव  प्रक्रिया घेतली.बागेत लिलाव प्रक्रिया करण्याची ही पहिलीच वेळ असून यामध्ये मुंबई सोबतच इचलकरंजी मधील सहा व्यावसायिक सहभागी झाले होते.शुक्रवारी मुहूर्ताच्या बारा डझन आंबा विक्री केला गेला. लिलावामध्ये पहिल्या सहा डझन च्या एका पेटीची रक्कम अठरा हजार रुपये होती. लिलावामध्ये तिला पंचवीस हजार रुपये शेवटची बोली  लागली. याबाबत बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, कर्नाटकी आंबा भेसळ  करत असल्यामुळे अपेक्षित दर मिळत नाही.

बहुतांशी बाजार समितीमध्ये ही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे रत्नागिरी, देवगडचा हापूस थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी विविध प्रकारच्या कंपन्या व विक्रेत्यांना बागेत आणण्यात येणार आहे. पावस येथील हापूस ची स्थिती पाहिली तर येथे बागेत सतराशे कलमे असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत वीस हजार पेटी आंबा मिळेल अशी आमची अपेक्षा आहे तसेच भविष्यात बागांची व्यवस्थापन करताना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 

पावसातील बागेचे उत्तम असे व्यवस्थापन संदीप डोंगरे यांनी केले असून फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मध्ये हापूस बाजारात आणण्यासाठी सहा महिने प्रयत्न करत होते. हवामान बदलाचा परिणाम हा मोहोर आणि कैरी वर होणार नाही यासाठी काळजी घेत बाजारपेठेमध्ये हापूसची पेटी आणण्यात यश आले.

English Summary: in pawas get 26 thousand rupees rate to six dozen mango box
Published on: 12 February 2022, 09:00 IST