News

शेतकरी आपल्या शेतात दिवसभर राब राब कष्ट करत असतो मात्र त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचे आपल्याला नेहमी दिसून येते. असच एक चित्र औरंगाबाद मधील एका बाजार समितीमध्ये आणि मंडई मध्ये दिसून आले आहे .शेतीमालाला पाहिजे असा भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल दिसून येत आहेत मात्र शेती मालाला मातीमोल भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी आपली नाराजी व्यक्त करत आहेत

Updated on 21 August, 2021 6:43 PM IST

शेतकरी आपल्या शेतात दिवसभर राब राब कष्ट करत असतो मात्र त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचे आपल्याला नेहमी दिसून येते. असच एक चित्र औरंगाबाद मधील एका बाजार समितीमध्ये आणि मंडई मध्ये दिसून आले आहे.शेतीमालाला पाहिजे असा भाव  मिळत  नसल्यामुळे  शेतकऱ्यांचे  हाल दिसून येत आहेत मात्र शेती (farmer)मालाला मातीमोल भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी आपली नाराजी व्यक्त करत आहेत

शेतकऱ्यांच्या शेती मालाला व्यापारी योग्य तो भाव देत नाहीत हे औरंगाबादमध्ये घडत असताना दिसत आहे. पैठण मधील एका शेतकऱ्याने त्याच्या टोमॅटो ला भाव मिळत नसल्याने आखी ट्रॉली रस्त्यावर उधळून दिली.

शेतकऱ्यांची मंदी व्यापाऱ्यांची चांदी:-

औरंगाबाद येथे बाजारामध्ये शेतकरी जो शेतीमाल आणत आहेत त्या मालाला कसलाच भाव दिला जात नाही. जसे की शेतकरी वर्गाकडून कमी किमतीमध्ये माल विकत घेऊन व्यापारी वर्ग अगदी चांगल्या भावात मालाची विक्री करत  असल्याचे  चित्र  डोळ्यासमोर  दिसत  आहे. मागील  काही  दिवसपूर्वी  एका शेतकऱ्याने त्याच्या मिरचीला कसलाच भाव नसल्यामुळे सर्व मिरच्या रस्त्यावर फेकून  दिल्या.जेव्हा शेतकऱ्यांच्या शेती  मालाला  व्यापाऱ्यांची  बोली  लागते त्यावेळी त्या बोलीमधून शेतकऱ्यांच्या येण्याजण्याचा खर्च सुद्धा  निघत  नाही. अशी  परिस्थिती निर्माण  झालेली  आहे  यामध्ये  शेतकरी  वर्गाची  मंदी  पण व्यापाऱ्यांची चांदी दिसून येत आहे.

हेही वाचा:यंदा देशांतर्गत सोयाबीन लागवडीत घट

पैठणमध्ये लाल चिखल:-

पैठण मध्ये मालाला आजिबात भाव नसल्याने एका शेतकऱ्याने आपली टोमॅटो रस्त्यावर फेकून दिली ही घटना औरंगाबाद मधील पैठण तालुक्यातील केकत या गावी घडली. ज्या शेतकऱ्याने टोमॅटो फेकून दिली त्याचे नाव अजिनाथ थोरे असे आहे जे की योग्य भाव मिळाला नाही म्हणून हा शेतकरी संतापात गेला आणि टोमॅटो फेकून दिली. अनेक जनावरे ती टोमॅटो खाताना दिसली.

शेतकऱ्यांना हमीभावाची हमी यासाठी हवी:-

शेतकऱ्यांनी जो माल मोठ्या प्रमाणात उत्पादित केला आहे त्या मालाला कवडीमोल भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. कमीत कमी थोडी जरी किमंत शेतमालाला दिली तरी सुद्धा शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाचे फळ भेटेल असे वाटते त्यामुळे शेतकऱ्यांना अशी आशा असते की त्यांच्या शेतमालाला थोडा तरी भाव मिळावा आणि त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ भेटावे.

English Summary: In Paithan, a farmer gave tomatoes and threw them on the road
Published on: 21 August 2021, 06:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)