News

राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषी विभाग अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग राज्यात अमलात आणत असते. कृषी विभाग शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व कृषी क्षेत्रातील अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना सदैव मदत करत असते. विदर्भात देखील कृषी विभागाने असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग अमलात आणला होता, अजूनही कृषी विभाग याद्वारे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे. कृषी विभागाने विदर्भातील नागपूर जिल्ह्यात सोयाबीन बीजोत्पादन हा उपक्रम हाती घेतला आहे.

Updated on 08 February, 2022 9:35 PM IST

राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषी विभाग अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग राज्यात अमलात आणत असते. कृषी विभाग शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व कृषी क्षेत्रातील अडचणींवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना सदैव मदत करत असते. विदर्भात देखील कृषी विभागाने असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग अमलात आणला होता, अजूनही कृषी विभाग याद्वारे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे. कृषी विभागाने विदर्भातील नागपूर जिल्ह्यात सोयाबीन बीजोत्पादन हा उपक्रम हाती घेतला आहे.

या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात उत्पादित केलेले सुमारे 30 हजार क्विंटल सोयाबीन आगामी खरीप हंगामासाठी बियाणे म्हणून साठवून ठेवले आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 14 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे. 2021 या साली खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक लाख हेक्‍टर क्षेत्रावर पावसाळी सोयाबीनचा पेरा केला होता. कृषी विभागाने जिल्ह्यात प्राथमिक स्थरावर शेतकऱ्यां मार्फत बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमात सुमारे 14 हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. या उपक्रमा अंतर्गत सोयाबीनचे प्राप्त होणारे बियाणे पुढील खरीप हंगामासाठी म्हणजे 2022 च्या खरीप हंगामासाठी उपयोगात आणले जाणार आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकरी स्तरावर प्रचार, प्रसार आणि प्रोत्साहित करण्याचे कार्य केले. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषी विभागाने स्वतः दिले. राज्यात मागील अनेक वर्षांपासून सोयाबीन बियाण्याची टंचाई जाणवत असते, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शेतकऱ्यांना अनेकदा चढ्या दरात सोयाबीन बियाण्याची खरेदी करावी लागते.

हीच गोष्ट लक्षात घेता कृषी विभागाने 2021 च्या खरीप हंगामात सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमाला हाती घेतले. या उन्हाळी हंगामात देखील पुढील उन्हाळी हंगामाच्या दृष्टीने जिल्ह्यात सोयाबीन बीजोत्पादन उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमा अंतर्गत उन्हाळी हंगामासाठी सुमारे 1 हजार 52 हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची लागवड करण्यात आली. या एवढ्या मोठ्या क्षेत्रावरून जवळपास पंधरा हजार क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होण्याची आशा आहे. आगामी खरीप हंगामात जवळपास 95 हजार हेक्‍टर क्षेत्र सोयाबीनच्या लागवडीखाली असेल असा विभागाचा अंदाज आहे. या एवढ्या मोठ्या क्षेत्रासाठी सुमारे 90 हजार क्विंटल बियाण्याची गरज भासणार आहे, मात्र  2021च्या खरीप हंगामात 30 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना बियाण्यांची टंचाई भासणार नाही असा कृषी विभागाचा अंदाज आहे.

आगामी खरीप हंगामात आवश्यक सोयाबीन बियाणे उपलब्ध व्हावे या अनुषंगाने हा बीजोत्पादन कार्यक्रम राबविला होता जो की उन्हाळी हंगामात देखील राबविण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत खरीप हंगामासाठी तीस हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध आहे, महाबीज मार्फत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 25 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच राष्ट्रीय बीज निगमामार्फत थोडे बियाणे उपलब्ध होणार असून पंचवीस हजार क्विंटल बियाणे खाजगी कंपन्यांकडून सहज उपलब्ध होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. या उपक्रमामुळे प्राप्त झालेले सोयाबीन बियाणे खरीप हंगामासाठी उपयोगात येईल आणि त्यामुळे खाजगी कंपनी वर असणारे शेतकऱ्यांचे अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

English Summary: in next kharip season soyabean seed shortage will not trouble because
Published on: 08 February 2022, 09:35 IST