News

राज्यात सध्या थंडीचा कडाका प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तापमानामध्ये चढ-उतार होत असून थंडीमात्र कायम आहे.

Updated on 25 January, 2022 9:46 AM IST

राज्यात सध्या थंडीचा कडाका प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तापमानामध्ये चढ-उतार होत असून थंडीमात्र कायम आहे.

येणार्‍या पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार  असून थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. संपूर्ण देशातल्या तापमानात मोठी घट होणार असल्याचेही हवामान विभागाचे म्हणणे आहे.त्यादृष्टीने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येणार्‍या पुढच्या पाच दिवसात उत्तर पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांशी भागामध्ये किमान तापमानात तीन ते पाच अंशांनी घट होण्याची शक्यता आहे तर 25 आणि 26 जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

 हवामान बदलामुळे राज्यावर धुळ आणि धुक्याचे मळभ

 हवामानामध्ये अचानक मोठा बदल झाल्याने रविवारी राज्याच्या बहुतांशी बागांवर धूळ आणि धोक्याचे मळभ निर्माण झालं होतं. 

व दिवसाच्या आद्रतेतून धुके आणि धूळ वाढवणाऱ्या वेगवान वार्याच्या एकत्रित परिणामाने ही स्थिती निर्माण झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ही स्थिती ठळकपणे जाणवली  तर सौराष्ट्र कडून धूलिकण घेऊन आलेल्या वाऱ्यांमुळे रविवारी मुंबईच्या अनेक भागात हवेचा दर्जा खालाऊन धोकादायक पातळीवर पोहोचला होता.

English Summary: in next coming day growth in cold in country due to change in atmosphere
Published on: 25 January 2022, 09:46 IST