नाशिक पुणे रेल्वेमार्गासाठी नाशिक जिल्ह्यात जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे पहिले खरेदी खत नोंदवण्यात आले.
बारागाव पिंपरी येथील कमळाबाई कुऱ्हाडे यांचा गट नंबर 673 मधील बारमाही बागायती असलेले 0.59 हेक्टर क्षेत्र खरेदी करून भूसंपादन विभागाने एक कोटी एक लाख 84 हजार 760 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. या पहिल्या खरेदी खताच्या सोबतच नाशिक मध्ये याचा श्रीगणेशा झाला असून लवकर इतर शेतकऱ्यांनी जमीन खरेदी खत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नाशिक पुणे दुहेरी मध्यम द्रुतगती रेल्वे मार्ग
नाशिक-पुणे या दुहेरी मध्यम द्रुतगती ब्रॉडगेज लाईनचे विद्युतीकरण सह इतर बांधकामासाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि नाशिक तालुक्यातील 23 गावांमधील जमीन थेट वाटाघाटी द्वारे खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने नुकतेच सहा गावांसाठी जमिनीचे दर जाहीर केले आहेत. दर जाहीर होण्याला एक महिना उलटल्यानंतरही खरेदीसाठी शेतकरी पुढे येत नसल्याने तसेच इतर गावांचे दर जाहीर करण्यासाठी शासनाच्या इतर विभागाकडूनही विलंब केला जात आहे.
तसेच दर वाढवून मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी पुण्याच्या धर्तीवर नाशिक येथील शेतकऱ्यांना देखील पैसे द्यावे या मागणीवर अडून बसले आहे. अशातच प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सिन्नरच्या कमळाबाई कुराडे या महिला शेतकऱ्याने लागलीच आपले बारमाही शेताची खरेदी नोंदवली. सिन्नर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात महारेलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी, सेवानिवृत्त तहसीलदार उदय कुलकर्णी यांच्यासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खरेदीखत नोंदविण्यात आले. दरम्यान त्यांच्या खात्यात पुढील एक ते दोन दिवसात पैसे जमा केले जाणार असल्याचे महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी वाटाघाटी पद्धतीने अर्थात थेट खरेदी साठी पुढील सहा महिने जमीन खरेदी विक्री ची मुदत असून लवकरात लवकर खरेदी खत नोंदवावी असे आवाहन जिल्हाधिकारी डी गंगाधरण यांनी केले.
सहा महिन्यानंतर भूसंपादन कायद्याने सक्तीचे भूसंपादन केले जाईल असे महारेलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:राज्यात ५० लाख टन अतिरिक्त उसाचा प्रश्न, भाजप किसान मोर्चा सरकारवर आक्रमक
नक्की वाचा:मोठी बातमी : गव्हाच्या सरकारी खरेदीत घट; तुटवडा निर्माण होण्याची शक्यता
Published on: 05 May 2022, 02:27 IST