News

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो काही पाऊस झाला त्या पावसाने एका बाजूने शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या मिटवली परंतु या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याला भाजीपाला हा देखील अपवाद नाही. बऱ्याच ठिकाणी ऐन काढणीवर आलेला भाजीपाला या जास्त झालेल्या पावसामुळे खराब झाला व त्यामुळे बाजारपेठांमध्ये होणारी भाजीपाल्याची आवक घटली व मागणीच्या मानाने पुरवठा कमी झाल्याने सगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत.

Updated on 23 September, 2022 10:09 AM IST

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो काही पाऊस झाला  त्या पावसाने एका बाजूने शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची समस्या मिटवली परंतु या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्याला भाजीपाला हा देखील अपवाद नाही.

बऱ्याच ठिकाणी ऐन काढणीवर आलेला भाजीपाला या जास्त झालेल्या पावसामुळे खराब झाला  व त्यामुळे बाजारपेठांमध्ये होणारी भाजीपाल्याची आवक घटली व मागणीच्या मानाने पुरवठा कमी झाल्याने सगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत.

नक्की वाचा:राज्यात दिवाळी आणि दसऱ्यामुळे बेदाण्याच्या दरात सुधारणा, बाजारात सुद्धा प्रचंड मागणी

त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले यात शंकाच नाही. परंतु शेतकरी वर्गाला यामुळे दिलासा मिळेल हे देखील पाहणे तेवढेच गरजेचे आहे. याचाच परिणाम गुरुवारी सायंकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य बाजार आवारात कोथींबीरीच्या झालेल्या लिलावात बघायला मिळाला.

 कोथिंबिरीला मिळाला इतका भाव

 जर आपण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा विचार केला तर या बाजार समितीत दिंडोरी, निफाड, पेठ, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, मखमलाबाद तसेच मसरूळ इत्यादी ठिकाणाहून  आणि जिल्ह्याच्या बाहेरील पुणे जिल्ह्याच्या काही  ठिकाणाहून पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असते.

नक्की वाचा:Relief Fund: 'या' जिल्ह्यातील नुकसान ग्रस्तांसाठी 48 लाखांचा निधी,वाचा या बाबतीत सविस्तर माहिती

यामध्ये शिवांजली कंपनीमध्ये दिंडोरी तालुक्यातील कोराटे गावातील शेतकरी सोमनाथ शिवाजी भवर हे कोथिंबीर विक्रीसाठी घेऊन आले होते व त्यांच्या कोथिंबीर 16 हजार रुपये प्रति शेकडा इतका बाजार भाव मिळाला. याप्रमाणे सगळ्यात भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत.

परंतु झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे शेतात कितपत भाजीपाला असेल हादेखील एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या वाढलेल्या भावाचा कितपत शेतकऱ्यांना फायदा होईल यात शंकाच आहे. परंतु वाढलेल्या भाजीपाला दरांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडेल हे पक्के.

नक्की वाचा:सांगा शेती करायची कशी! कांद्यापाठोपाठ लसनाचीही दुर्दशा; बाजारात मिळतोय 5 रुपये किलो भाव

English Summary: in nashik market commitee get high rate to corriender today
Published on: 23 September 2022, 10:09 IST