News

जर आपण प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होते.नाशिक जिल्ह्यातील येवला,सटाणा,देवळा तसेच नांदगाव या तालुक्यांमध्ये कांद्याचेमोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. यावर्षी दिवाळीनंतर नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक चांगली झाल्याने कांदा मार्केट गजबजलेली आहेत

Updated on 28 November, 2021 2:29 PM IST

जर आपण प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन होते.नाशिक जिल्ह्यातील येवला,सटाणा,देवळा तसेच नांदगाव या तालुक्यांमध्ये कांद्याचेमोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. यावर्षी दिवाळीनंतर नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक चांगली झाल्याने कांदा मार्केट गजबजलेली आहेत

उन्हाळी कांद्याची आवक बऱ्यापैकी होत असूनआवक टिकून आहे आणि नवीन लाल कांद्याची आवक नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून अत्यल्प प्रमाणात होत आहे.परंतु कांदा दराचा विचार केला तर उन्हाळी कांद्याच्या तुलनेने लाल कांद्याला मागणी वाढत असल्याने त्यास चांगला भाव मिळत आहे.

 या वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये प्रमुख कांदा पट्ट्यात अतिवृष्टी झाल्यामुळे कांदा रोपवाटिका यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यामुळे खरीप कांद्याचेअपेक्षित लागवड होऊ शकलेली नाही. जे काही लागवड झाली ते अत्यल्प असल्याने लवकर लागवड केलेल्या कांद्याची आवक फारच कमी आहे.

 जरा नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमधील लाल कांदा आवक असा विचार केला तर पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षी 14 ऑक्टोबर पासून खरीप लाल कांद्याची आवक सुरू झाली होती.मात्र यावर्षी यावर 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. म्हणजे तब्बल एक महिना उशिराने आवक होत आहे.  शुक्रवारी(ता.26)उन्हाळी कांद्याची सरासरी आवक बारा हजार क्विंटल इतकी होत असताना लाल कांद्याची आवक ही 1292 क्विंटल झाली.आठवड्यापासून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर जर दराचा विचार केला तर उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटलला सरासरी 1775 रुपये तर लाल कांद्याला 2351 रुपये दर मिळाला. परंतु या दराची जर मागच्या वर्षाच्या दराशी तुलना केली तर लाल कांद्याचे दर हे कमी आहेत. मागच्या महिन्याचा विचार केला तर उन्हाळी कांद्याची आवक 15 हजार क्विंटल असताना अवघ्या 1,00क्विंटल वर ही आवक होती. त्यावेळी दोन्ही कांद्याचे दर सारखेच राहिले मात्र चालू महिन्यात उन्हाळी कांद्याची आवक 60 टक्के कमी झाली आहे.(संदर्भ-अग्रोवन)

English Summary: in nashik district market commite get more rate red onion than rubby old onion
Published on: 28 November 2021, 02:29 IST