News

केंद्र सरकारने 2016 मध्ये स्टॅन्ड अप इंडिया या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमातींना आणि महिला उद्योजकांना मदत करण्यात येते.

Updated on 08 February, 2022 9:22 AM IST

केंद्र सरकारने 2016 मध्ये स्टॅन्ड अप इंडिया या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती-जमातींना आणि महिला उद्योजकांना मदत करण्यात येते.

या योजनेअंतर्गत नवउद्योजकांनी स्वतःच्या वाट्याची दहा टक्के रक्कम भरणा केल्यानंतर बँकेकडून स्टॅन्ड अप इंडिया योजनेच्या माध्यमातून 75 टक्के कर्ज मंजूर होते. उरलेले फ्रंट ऍण्ड सबसिडीच्या स्वरूपामध्ये नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याचे एकूण 15 टक्के अनुदान शासनामार्फत देण्यात येते.नव उद्योजकांसाठी  ही योजना खूप लाभदायी आहे. केंद्र सरकारच्या स्टँड अप इंडिया योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात आले असून इच्छुकनवउद्योजकांनी या अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन नाशिक जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदर सिंग वसावे यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नव उद्योजकांसाठी ही योजना सुरु केली असून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील 18 वर्षावरील उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.

 कसा घ्याल या योजनेचा लाभ?

 जर या योजनांतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर या तीन पद्धती बँकेपर्यंत पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यातील पहिली म्हणजे ज्या पात्र असलेल्या उद्योजकाला कर्ज घ्यायचे असेल त्याने स्वतः प्रत्यक्षपणे बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा. दुसरी पद्धत म्हणजे स्टॅन्ड अप इंडिया पोर्टल  http://standupmitra.inद्वारे पात्र लाभार्थी अर्ज करू शकतात आणि तिसरी पद्धत म्हणजेलीडडिस्ट्रिक्ट मॅनेजर च्या माध्यमातून सुद्धा कर्ज मिळवता येते.(source-tv9marathi)

English Summary: in nashik district available subsidy to stand up india scheme
Published on: 08 February 2022, 09:22 IST