News

निसर्गाच्या अनियमितपणामुळे पिकांवर तसेच भाजीपाल्यावर परिणाम होत आहे. मागील पाच वर्षांपासून उत्पादनात घट होत असल्याने मिरची चे मुख्य ठिकाण नंदुरबार मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात क्षेत्र कमी झाले आहे.हंगामातील मिरचीला आवक झाली असल्याने दिवसाकाठी येथे ३ हजार क्विंटल मिरचीची आवक होत आहे तर लाल मिरचीला दोन हजार ते अडीच हजार प्रति क्विंटल असा भाव भेटत आहे.

Updated on 17 November, 2021 5:31 PM IST

निसर्गाच्या अनियमितपणामुळे पिकांवर तसेच भाजीपाल्यावर परिणाम होत आहे. मागील पाच वर्षांपासून उत्पादनात घट होत असल्याने मिरची चे मुख्य ठिकाण नंदुरबार  मध्ये  सुद्धा  मोठ्या प्रमाणात क्षेत्र कमी झाले आहे.हंगामातील मिरचीला आवक झाली असल्याने दिवसाकाठी येथे ३ हजार क्विंटल मिरचीची आवक होत आहे तर लाल मिरचीला दोन हजार ते अडीच हजार  प्रति क्विंटल असा भाव भेटत आहे.

परराज्यातही  या क्षेत्रात घट:

हंगामातील मिरचीची आवक तर बाजारामध्ये सुरू झाली मात्र दरवर्षीपेक्षा यावेळी आवक कमी होईल असा अंदाज लावला आहे.कारण मिरची पिकातून जास्त प्रमाणात तोटा होत असल्यामुळे शेतकरी वर्ग आता त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हंगामाच्या सुरुवातीला चांगल्या प्रमाणत आवक राहील असे सांगण्यात आले आहे.नंदुरबार जिल्हा म्हनजे मिरचीसाठी प्रमुख आणि जगप्रसिद्ध ठिकाण जे की येथील मिरची परदेशात सुद्धा दाखल होते. नंदुरबार जिल्ह्यात वेगवेगळ्या मिरचीचे उत्पादन काढले जाते. या जिल्ह्यातील परिसरात प्रति वर्ष १० हजार एकर पेक्षा जास्त लागवड केली जाते परंतु मागील काही दिवसांपासून या क्षेत्रात घट होत निघाली आहे.

मिरची लागवडीत होतेय घट:-

निसर्गाच्या अनियमितपणामुळे झालेला कमी पाऊस आणि उत्पादनाच्या तुलनेमध्ये झालेला जास्त खर्च त्यामुळे शेतकऱ्यांना मिरची परवडत नाही त्यामुळे मागील पाच वर्षात मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झेलावे लागले आहे. सध्या शेतकरी मिरची लावण्यापेक्षा ऊस, केळी आणि पपई लागवडीकडे लक्ष देत आहेत.

अडीच हजाराचा सरासरी दर:-

यावर्षी मिरचीला चांगल्या प्रकारे दर मिळत आहे जे की व्हीएनआर, जरेला, फापडा या जातीच्या मिरच्यांना चांगला भाव मिळालेला आहे. दिवसाकाठी जवळपास दोन ते अडीच हजार क्विंटल मिरची बाजारात विक्रीसाठी येत आहे. परराज्यातील व्यापारी वर्ग मिरची खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये येत आहेत. मिरचीला २ हजार ते २६०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.

English Summary: In Nandurbar district, production of chillies declined but rates increased
Published on: 17 November 2021, 05:30 IST