शेती मालाचे बाजार भाव बद्दल आपण कायम अनुभव घेत असतो की, एखाद्या हंगामात खूपच चांगला भाव मिळतो तर कधीकधी एकदमच भाव घसरतात.
आता बर्याच पिकांचे हमी भावानुसार खरेदी केली जाते. जर आपण या हमी भावाच्या तुलनेत खुल्या बाजाराचा विचार केला तर कधीकधी हमीभावापेक्षा ही कमी दर खुल्या बाजारात असतात तर कधीकधी हमीभावापेक्षा जास्त दर खुल्या बाजारात असतात. आता आपल्याला माहित आहेच की या भावाचे गणित हे मागणी आणि पुरवठाच्या समीकरणावर अवलंबून असते. परंतु बऱ्याचदा देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती देखील शेतमालाचे भाव ठरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. आता सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांत दरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धाचे परिणाम हे सगळ्याच गोष्टींवर पडत असून बर्याच प्रकारच्या शेतमालाच्या आयात निर्यात प्रभावीत झाल्यामुळे त्यांच्यावर देखील होत आहे. आता आपल्याला माहित आहेच की रशिया आणि युक्रेन हे प्रमुख गहू निर्यातदार देश आहेत. परंतु तेथील परिस्थितीमुळे यावर परिणाम झाला असून याचा फायदा भारतीय गहू उत्पादक शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. त्याचेच प्रत्यंतर नंदुरबार बाजार समितीमध्ये पाहायला मिळाले.
नक्की वाचा:कोळी कीड आहे बीटी कपाशी वरील सर्वात खतरनाक कीड, अशा पद्धतीचे व्यवस्थापन ठरेल फायदेशीर
गव्हाला मिळाला अविश्वसनीय भाव
याबद्दलची सविस्तर माहिती अशी की, धुळे जिल्ह्यातील छडबील या गावचे शेतकरी यांनी त्यांचा 973 हा वाणाचा गहू बाजारपेठेत विक्रीसाठी आणला होता. लिलावात या गव्हाला चक्क 5 हजार 451 रुपये क्विंटल असा दर मिळाला. वाचून आश्चर्य वाटेल असा हा दर आहे. कदाचित कधीच एवढा दर गव्हाला कोणी ऐकला नसेल? या शेतकऱ्याने आठ क्विंटल गहू विक्रीला आणला असता त्यांना एवढा दर मिळाला. जर आता नंदुरबार बाजारपेठेचा गहू आवक बद्दल बोलायचे झाले तर सध्या ही आवक कमी आहे. भविष्यात आणखी आवक कमी होत गेली तर भाव वाढतील असा एक अंदाज आहे. या बाजार समिती मध्ये दर दिवशी सरासरी चार हजार क्विंटलपर्यंत गव्हाची आवक होत आहे. सरासरी गव्हाला दोन हजार ते अडीच हजार पर्यंत दर मिळत आहे.
नक्की वाचा:Duck Farming Business: बदक पालन कुकूटपालनापेक्षा अधिक फायदेशीर; मिळणार बक्कळ नफा
गहू दरवाढी मागील कारणे
यावर्षी खरीप हंगामावर तर अतिवृष्टीने वक्रदृष्टी केली होती. त्यामुळे खरिपातील सोयाबीन आणि कापूस यासारखी पिके नष्ट होऊन त्यांच्या उत्पादनात घट आली होती.
त्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने रब्बीची तयारी केली. रब्बी हंगामातील पिके चांगली बहरली परंतु मध्यंतरी अवकाळी ने कहर केला. पुढे रब्बी हंगामातील पिकांवर देखील परिणाम झाला व उत्पादनात घट तर झालीच परंतु पिकांचा उतारा देखील कमी झाला. हेच गणित गव्हाला लागू झाल्याने अवकाळी मुळेच गव्हाच्या उत्पादनात देखील 20 टक्क्यांपेक्षा अधिक घट आली आहे. त्यामुळेच भविष्यात गव्हाचे दर वाढतील असा एक अंदाज आहे.
Published on: 09 April 2022, 07:41 IST