पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळावा यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा अग्रणी बँकेकडून 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत किसान क्रेडिट कार्ड विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
या मोहिमेचा सर्व पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले.
भारतामध्ये शेती व्यवसायाला चालना मिळावी तसेच बरेच शेतकरी जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करत असतात. अशा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना अशा योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळावी व त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये भरभराट करावी हा एक प्रमुख उद्देश आहे.
राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेच्या अंतर्गत दूध व्यवसाय करणारे व्यवसायिक, शेळीपालन किंवा कुकुट पालन करणारे पशुपालक अशांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, असे नंदुरबार जिल्ह्यातील सात हजार सातशे दोन पशुपालक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पशुपालन करणाऱ्या या पशुपालकांकडे शेती असेल अशा पशुपालकांना किसान क्रेडिट कार्ड ची पत मर्यादा वाढवून मिळेल.व्याजावर सवलत फक्त तीन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी राहील. तसेच घेतलेल्या कर्जासाठी व्याज सवलत तर 2 टक्के राहील, जे पशुपालक वेळेवर कर्जाची परतफेड करतील अशा शेतकर्यांना अतिरिक्त व्याज सवलतीचा लाभ मिळेल.
या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे पशुपालनासाठी लागणारे खेळते भांडवल उपलब्ध होण्यासाठी असून या योजनेच्या माध्यमातून एका म्हशीसाठी14 हजार रुपये, एका गाईसाठी बारा हजार रुपये, शेळी गट 10+1 साठी बारा हजार पाचशे रुपयेते20 हजार रुपये, 100 ब्रॉयलर पक्षांसाठी आठ हजार रुपये तरलेअरसाठी पंधरा हजार रुपये आणि गावरान पक्षांसाठी पाच हजार रुपये पर्यंत खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे.
Published on: 17 January 2022, 10:08 IST