महाराष्ट्रमध्ये जुलै ते सप्टेंबर या दरम्यान जो पाऊस झाला त्या झालेल्या पावसामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. जर आपण या पिकांच्या नुकसानीचा विचार केलात तर यामध्ये सगळ्यात प्रकारची पिके आणि प्रामुख्याने सोयाबीन व कापूस या पिकांना मोठा फटका बसला. एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील सगळ्यात जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात या झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. परंतु या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सगळ्यात जास्त फटका मराठवाड्याला बसला आणि त्यानंतर विदर्भाचा क्रमांक लागतो.
नक्की वाचा:आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यात वैदर्भीय शेतकरी अग्रेसर :- कुलगुरू डॉ. शरद गडाख
अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे खरीप हंगामात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सरकारने तात्काळ दखल घेत शेतकऱ्यांसाठी तीन हजार पाचशे एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यामुळे थोडाबहुत का असेना शेतकरी बंधूंना दिलासा मिळाला आहे.
परंतु या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना ही मदत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी शासन स्तरावरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या नुकसानीमध्ये मराठवाड्यातील नांदेड जिल्हा देखील अपवाद नव्हता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या पावसात नांदेड जिल्ह्याला देखील मोठा फटका बसून शेतकरी बांधवांचे खूप नुकसान झाले.
जर आपण एकटे नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर झालेल्या पावसाने सात लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांचे पाच लाख 27 हजार 491 हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली. या सगळ्या परिस्थितीचा पंचनामा करून सदरचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता.
नांदेड जिल्ह्याला मिळाले 717 कोटी 88 लाख रुपये
त्या दृष्टिकोनातून नांदेड जिल्ह्यातील ज्या काही शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यांना आर्थिक साहाय्य म्हणून 717 कोटी 88 लाख रुपयांचा निधी पाठवला असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना जलद गतीने मदत मिळावी यासाठी काम सुरू केले आहे.
यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे त्या शेतकरी बांधवांना या निधीचा फायदा होणार आहे. हा निधी आता तालुकास्तरावर प्राप्त झाला असून लवकरच अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग दिला जाणार आहे.
तालुकानिहाय आलेला निधी
जर आपण नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यात सोळा तालुके असून तालुकानिहाय निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये नांदेड 25 कोटी 89 लाख, किनवट- 67 कोटी 9 लाख, माहूर-22 कोटी 20 लाख, हिमायतनगर-42 कोटी 74 लाख,मुदखेड- 24 कोटी 27 लाख, अर्धापूर -29 कोटी 16 लाख, कंधार - 55 कोटी बारा लाख, लोहा - 61 कोटी पाच लाख, देगलूर- 42 कोटी 95 लाख, मुखेड- 54 कोटी 70 लाख, बिलोली-40 कोटी 35 लाख, नायगाव- 45 कोटी पाच लाख, धर्माबाद- 29 कोटी 53 लाख, उमरी-40 कोटी 11 लाख,भोकर- 52 कोटी 43 लाख एवढा निधी वर नमूद केलेल्या तालुक्यांना मिळाला आहे.
नक्की वाचा:बंगालच्या उपसागरात 'सीतरंग' चक्रीवादळाची शक्यता, यामुळेच महाराष्ट्रात तुफान पाऊस..
Published on: 19 October 2022, 02:13 IST