बऱ्याचदा अतिवृष्टी,विज पडणे, साथीचे रोग किंवा अशाच अन्य कारणांमुळे जनावरे मृत्युमुखी पडतात व पशुपालकांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. अशाच नुकसान झालेल्या पशुपालकांना दिलासा देण्यासाठी नगर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत आर्थिक मदत देण्यात येत आहे.
गेल्या तीन वर्षाचा विचार केला तर पाचशेहून अधिक पशुपालकांना 27 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे आणि अजून 40 लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली. नगर जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यांमध्ये दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो.त्यामुळे शेळ्या,मेंढ्या, गाई आणि मशीन सारख्या दुखते जनावरांची संख्या अधिक असल्याने तसेच त्यासोबत या जनावरांच्या किमती देखील जास्त असतात त्यामुळे एक जरी जनावर दगावले तरी त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका हा पशुपालकाला बसतो.
या पार्श्वभूमीवर अशा नुकसानग्रस्त पशुपालक शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात मदत देण्याची कल्पना सभापती गडाख यांना सुचली व त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तीन वर्षांपूर्वी तरतूद केली व दगावलेल्य मोठ्या जनावराला 10000, लहान जनावराला प्रत्येकी एक हजार याप्रमाणे पाच जनावरांकरिता नुकसान भरपाई देण्याची योजना सुरू केली.
2021-22 झालेल्या नुकसान भरपाई कोटी प्राप्त प्रस्ताव आणि त्यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद दहा लाख अरे त्यामध्ये आणखी पाच लाखांची वाढ करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार झालेल्या ठरावानुसार गारपीट, चक्रीवादळ,, थंडी आणि विषबाधेमुळे मृत पावलेल्या जनावरांसाठी आणखी 40 लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.(स्त्रोत-सामना)
Published on: 09 February 2022, 01:25 IST