News

देशात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड (Onion planting) केली जाते, तसं बघायला गेलं तर कांदा एक नगदी पीक (Cash crop) आहे मात्र शेतकरी बांधव याला नेहमीच बेभरवशाचे पीक (Unbelievable crop) म्हणून संबोधत असतात याचे प्रमुख कारण म्हणजे कांद्याचे दर हे कधी गगनाला भिडत असतात तर कधीकाळी कांदा हा कवडीमोल दरात विकला जातो. त्यामुळे कांद्यावर कोंबडीचा देखील व्यवहार करू नये अशी म्हणच खानदेशात (In Khandesh) प्रचलित झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण (Economics) हे फक्त कांदा पिकावरच अवलंबून असते, त्यामुळे अनेकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (To onion growers) चांगले मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कांद्याच्या दरात नेहमीच लहरीपणा बघायला मिळत असतो, याचेच एक उत्तम उदाहरण मध्य प्रदेश राज्यात (In the state of Madhya Pradesh) समोर आले आहे. मध्यप्रदेश राज्यातील मंदसौर (Mandsaur) येथे कांदा विक्रीसाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला त्याच्या 100 किलो कांद्याच्या बदल्यात 50 रुपये मिळाले आहेत. म्हणजे एक क्विंटल कांदा पन्नास रुपयाला विक्री झाला (A quintal of onion sold for fifty rupees) आहे. आपण जर याचा हिशोब किलोमध्ये केला तर फक्त 50 पैसे किलो हा कांदा विकला गेला.

Updated on 03 January, 2022 5:03 PM IST

त्यामुळे आता सोशल मिडीयावर (On social media) मंदसौरच्या बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या या 100 किलो कांद्याची पावती चांगलीच व्हायरल होत आहे. कांदा खरेदी केलेल्या व्यापाऱ्याने व्यवहाराची पावती शेतकऱ्याला दिली असेल आणि तीच पावती (Receipt) सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. मात्र, असे असले तरी संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळेल याची आशा खूपच कमी आहे. असे सांगितले जाते की कांदा पिकवण्यासाठी सुमारे 17 रुपये किलो खर्च येतो म्हणजे एक क्विंटल कांदा काढण्यासाठी 1700 रुपये खर्च येतो, आणि जर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 50 पैसे किलो ने कांदा विक्री करावा लागेल तर शेतकऱ्यांचे उत्पन्न कशाला दुपटीने वाढेल याउलट तो कर्जबाजारीच होईल.

सोशल मीडियावर आता सरकारवर शेतकरी विरोधी असल्याचे आरोप (Government accused of being anti-farmer) केले जात आहेत. तसेच जर अशीच बळीराजाची पिळवणूक होत राहिली तर 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे स्वप्न कसं बरं पूर्ण होणार याउलट शेतकरी राजा अजूनच कंगाल बनत जाईल.

एकंदरीत शासनाचे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्याचे जे स्वप्न आहे ते फक्त कागदा पुरतेच मर्यादित आहे! त्यामुळे फक्त पांढरा कागद काळा झालेला दिसत आहे, मात्र वास्तविकता ही खूप विरोधाभासी आणि भयावय आहे हे या घटनेवरून साफ स्पष्ट झाले आहे. तसेच आता शेतकरी राजा प्रश्न उभा करता झाला आहे सांगा बरं शेती करायची कशी (How to farm).

English Summary: in mp mandsaur onion grower farmer sell 100kg onion for 50 rupees
Published on: 03 January 2022, 05:01 IST