News

यावर्षी पावसाने खरीप हंगामातील सगळ्यात पिकांचे अतोनात नुकसान केले. परंतु खरीप हंगामात घेतले शेवटचे पीक म्हणून तूर पीक ओळखले जाते. परंतु या पिकावर देखील मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन तुमचे झाडेच झाडे जाग्यावर वाळत आहेत. या रोगामुळे जवळजवळ मराठवाड्यातील 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून नुकसानभरपाईची मागणी होत आहे.

Updated on 19 December, 2021 9:57 AM IST

यावर्षी पावसाने खरीप हंगामातील सगळ्यात पिकांचे अतोनात नुकसान केले. परंतु खरीप हंगामात घेतले शेवटचे पीक म्हणून तूर पीक ओळखले जाते. परंतु या पिकावर देखील मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन तुमचे झाडेच झाडे जाग्यावर वाळत आहेत. या रोगामुळे जवळजवळ मराठवाड्यातील 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून नुकसानभरपाईची मागणी होत आहे.

परंतु विम्याच्या बाबतीत अगोदरच उदासीन असलेल्या पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवायकाही जिल्ह्यांमध्ये प्रशासनही याबाबतीत कुठल्याच प्रकारचे कारवाई करीत नसल्याने शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामध्ये परभणीच्या जिल्हाधिकारी यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेतील मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती नुसार विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 25% अग्रीम नुकसानभरपाई जमा करावी,अशा आशयाचे आदेश दिले आहेत.

 नांदेड जिल्ह्यातील तुरीचे परिस्थिती

 खरिपातील आंतरपीक म्हणून तूर या पिकाला ओळखले जाते. परंतु या पिकाचा कालावधी जास्त असल्याने काढण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे तुरीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर या वर्षी 71 हजार हेक्‍टरवर तुरीचा पेरा झाला आहे.

 परंतु आलेल्या अवकाळी पाऊस वातावरणातील अचानक बदलामुळे या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर विमा कंपनीने कोणतीही कारवाई केलेली नाही किंवा प्रशासनाने. या पार्श्वभूमीवर परभणी येथील जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी रिलायन्स विमा कंपनीला नुकसानभरपाईचे  आदेश दिले आहेत. त्यामुळे नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतानाच आता तुरीच्या पिकाची पंचनाम्याची मागणी होत आहे.

 या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे?

 तूर पिकाच्या संभाव्य नुकसान भरपाई ठरवण्यासाठी तूरपिकांच्या एकूण विमा संरक्षित  क्षेत्राच्या पाच टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण येत्या तीन दिवसांच्या आत पिक विमा कंपनी तसेच कृषी विभागाच्या वतीने केले जाणार आहे. 

त्यानुसार पात्र ठरणाऱ्या अधी सूचित महसूल मंडळांसाठी अशी प्रक्रिया ही करावीच लागणार आह.तरी शेतकऱ्यांना क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये विमा संरक्षित तूर पिकाच्या नुकसानीची माहिती फोटोसहअपलोड करावी लागणार आहे.  शिवाय काही अडचणी आल्यास 18001024088 वर तक्रार नोंदवायची आहे.शिवायविमा कंपनीच्या जिल्हा, तालुका कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह तक्रारही नोंदविता  येणार आहे.(संदर्भ-Tv9 मराठी)

English Summary: in marathwada pigeon pea crop damage due to mar disease question arise about crop insurence
Published on: 19 December 2021, 09:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)