News

मागच्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये मराठवाड्यामध्ये ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर वरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

Updated on 19 February, 2022 5:00 PM IST

मागच्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये मराठवाड्यामध्ये ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर वरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.

अक्षरशः  संपूर्ण पिके मातीमोल झाली होती. शेत पिकेच नाहीतर फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन जवळजवळ मराठवाड्यातील 44 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला होता. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी च्या दरापेक्षा अधिक निधी देण्याचे जाहीर केले होते.

त्या अनुषंगाने जाहीर केलेल्या निधीपैकी दिवाळीच्या वेळेस 75 टक्के निधी म्हणजेच 2821 रुपयांचा निधी मराठवाड्यासाठी वितरित केला होता. तर यामधून उरलेला 25 टक्के निधी म्हणजे 763 कोटी 75 लाख रुपयांचा बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी मिळावा यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे राज्य सरकारला नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. 

त्यानुसार शासनाने उर्वरित 25 टक्के म्हणजेच 773 कोटी 75 लाख 17 हजार रुपयांचा निधी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना वाटपासाठी दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला आहे.

English Summary: in marathwada farmer disburse 743 crore rupees fund to compansation
Published on: 19 February 2022, 05:00 IST