News

मिळालेल्या माहितीनुसार एम एच ०८. ९४५८ ही ट्रॅव्हल्स अमरनाथची तिर्थयात्रा करुन हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये ३५ ते ४० भाविक होते.

Updated on 01 September, 2023 4:15 PM IST

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात दोन खासगी बस ट्रॅव्हल्सचा समोरासमोर अपघात झाला आहे. या भीषण अपघात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. देवदर्शनावरुन परत असताना आज (दि.२९ जुलै) पहाटे ३ वाजता हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एम एच ०८. ९४५८ ही ट्रॅव्हल्स अमरनाथची तिर्थयात्रा करुन हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये ३५ ते ४० भाविक होते. तर एम.एच २७ बी.एक्स. ४४६६ या ट्रॅव्हल्समध्ये २५ ते ३० प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहा वरती या दोन गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.

पहाटेच्या सुमारास अपघात झालेल्या जखमी तात्काळ रुग्णवाहिका मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी यांनी जखमींना पोलिसांच्या वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय तात्काळ दाखल केले. 

दरम्यान, या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. अपघातात दोन्ही ट्रॅव्हल गाड्यांचं मोठं नुकसान झाले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक सुनील कडासने, उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी यांनी भेट दिली.

English Summary: In Malkapur, travelers returning from Devdarshan in a terrible accident 7 people died
Published on: 29 July 2023, 11:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)