मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये भाजीपाला व फळ विभागात शेतमाल लावण्याच्या वादातून दिलीप पवार राहणार वसंतवाडी तालुका पारोळा येथील शेतकऱ्याला मारहाण केली होती.
त्या अनुषंगाने मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील धनश्री वेजिटेबल कंपनी व रेणुका माता व्हेजिटेबल कंपनी या दोन्ही फर्मच्या भाजीपाला आडत व्यवसाय परवाना निलंबित केला आहे. याबाबतचे वृत्त सकाळनेसविस्तर प्रसिद्ध केले होते. त्याचे शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
शेतकरी व व्यापाऱ्यांनी मध्ये झालेल्या बोलाबाली चे रूपांतर हाणामारीत झाले. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला होता. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे लेखी तक्रार केली होती.
बाजार समितीने धनश्री व्हेजिटेबल कंपनीला नोटीस बजावत सात दिवसाच्या आत या बाबतीत खुलासा करण्याचे सांगितले होते. दिलेला खुलासा समाधानकारक न वाटल्यास समितीचा गाळा ताब्यात घेऊन तुमचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा दिला होता. परंतू खुलासा करण्याचा अवधी संपण्यापूर्वीच हे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसत असल्याने बाजार समिती प्रशासनाने दुसऱ्यादिवशी परवाना रद्द केल्याची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
घडलेल्या प्रकारांमध्ये धनश्री वेजिटेबल कंपनी सोबतच रेणुकामाता फर्मचाही सहभाग असल्यामुळे या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत शुक्रवारपासून ( दिनांक 8 )मे. रेणुका माता व्हेजिटेबल कंपनी व मे. धनश्री व्हेजिटेबल कंपनी या दोन्ही फर्मचा व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. निलंबित काळात आडतीचा
व्यवसाय करू नये तसेच आडत गाळा बंद ठेवण्यात यावा अशा आशयाची नोटीस समितीकडून देण्यात आले आहेत.
Published on: 08 October 2021, 10:01 IST