यावर्षी उन्हाळी कांद्याचे लागवड फार मोठ्या प्रमाणात झाली आहे. जर मागील काही आठवड्यांपर्यंतचा विचार केला तर कांद्याचे बाजार भाव बर्यापैकी स्थिर होते.
परंतु काहीच दिवसांपासून उन्हाळी कांदा बाजारपेठेत दाखल होत असल्यामुळे आवक वाढून कांद्याच्या दरात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे हे घसरलेल्या दर सावरावे त्यासाठी नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू करावी अशी विनंती स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी शासनाकडे केली होती.
नक्की वाचा:शेतीच व्यवस्थापन निसर्गाच्या हातात; निसर्गाच्या टाइमिंग नुसारच चला नाहीतर होईल नुकसान
त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर काल म्हणजेच मंगळवारपासून महाराष्ट्रात नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली. यावर्षी नाफेड मार्फत गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात जवळजवळ अडीच लाख टन कांदा खरेदी केली जाणार आहे.
याबाबत कांद्याचे दर घसरण्याची दाट शक्यता असल्यामुळे अनिल घनवट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार तसेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली होती व त्यासंबंधीचे निवेदन दिले होते. यामध्ये मूल्य स्थिरीकरण निधी च्या माध्यमातून किमान पंधरा रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने दोन लाख 20 हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मागच्या वर्षीच्या तुलनेत 50 हजार टन कांदा अधिक खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती अनिल घनवट यांनी दिली.
चालूला जो कांद्याचा बाजार भाव चालू आहे त्या दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेतला असून या निर्णयामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे.
या खरेदी करण्यात आलेल्या कांद्याची खरेदी तसेच साठवणूक करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील 20 शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचा आर्थिक गैरप्रकार होऊ नये त्यामुळे स्वतंत्र भारत पार्टी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेवून राहणार आहेत.
Published on: 20 April 2022, 10:11 IST