यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते, रब्बी हंगामात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावून पिकांची बर्यापैकी नासाडी करून ठेवली आहे.
शेतकरी राजा कसाबसा रब्बी हंगामातील पिकांना जोपासताना दिसत आहे. आणि अशातच आता भारतीय हवामान खात्याने राज्यात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांची येत्या काही दिवसात अजून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कमाई कमालीची घट झाली होती. याची भरपाई काढण्यासाठी शेतकरी राजा रब्बी हंगामाकडे मोठ्या आशेने बघत आहे, आणि जर अशातच पावसाने परत एकदा हजेरी लावली तर शेतकऱ्यांची स्वप्न धुळीला मिळेल एवढे नक्की.
हेही वाचा:- काय सांगता! आता घरबसल्या काही मिनिटातच करता येणार माती परीक्षण; जाणुन घ्या याविषयी सविस्तर
का येतोय मेघराजा?
हवामान खात्याचे मुंबई विभागाने 27 28 आणि 29 डिसेंबर या तीन दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार रविवारपासून महाराष्ट्रावर आणि सोमवार पासून मध्य भारतावर नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव पडणार आहे आणि त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जना होणार तसेच पावसाच्या हलक्या सऱ्या देखील बरसतील.
कुठे-कुठे पडणार पाऊस
हवामान खात्याने 28 आणि 29 तारखेला राज्यातील काही जिल्ह्यांसाठी येल्लो अलर्ट देखील जारी केला आहे. त्यानुसार मंगळवारी मराठवाड्यातील औरंगाबाद जालना हिंगोली परभणी जिल्ह्यात पाऊस हजेरी लावू शकतो, तर खानदेशातील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. पावसात समवेतच या जिल्ह्यात 40 किलोमीटर ताशी हवा देखील सुरू राहण्याची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे, मात्र सोमवारी फक्त विदर्भात पाऊस हजेरी लावेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. बुधवारी देखील पाऊस राज्यात हजेरी लावणार आहे, बुधवारी विदर्भातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली यवतमाळ नागपूर भंडारा या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावू शकतो तर मराठवाड्यातील हिंगोली जालना परभणी या जिल्ह्यात पावसाचे आगमन बघायला भेटणार आहे.
Published on: 25 December 2021, 09:42 IST