News

कृषी मंत्री कमल पटेल यांनी सोमवारी हरदा जिल्ह्यातील आबगाव खुर्द गावात हरभरा खरेदी केंद्र सुरू केले.

Updated on 25 March, 2022 5:12 PM IST

मध्य प्रदेशात हरभरा आणि मोहरीची सरकारी खरेदी सुरू झाली आहे.  शेतकरी खरेदी केंद्रांवर किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) आपला माल विकू शकतील. यावेळी मध्य प्रदेश सरकारने 8 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त हरभरा, 5 लाख मेट्रिक टन मोहरी आणि 1.5 ते 2 लाख मेट्रिक टन मसूर खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 

कृषी मंत्री कमल पटेल यांनी सोमवारी हरदा जिल्ह्यातील आबगाव खुर्द गावात हरभरा खरेदी केंद्र सुरू केले. यावेळी त्यांनी नव्याने बांधलेल्या गोदामाचे फीत कापून उद्घाटन केले. आधारभूत किमतीवर हरभरा विकण्यासाठी आलेल्या पहिल्या शेतकऱ्याचे कृषीमंत्री पटेल यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच खरेदीच्या कामासाठी लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याचे पूजन केले. हरभऱ्याच्या बाबतीत, देशातील सर्वाधिक क्षेत्र आणि उत्पादन मध्य प्रदेशात आहे. रब्बी मार्केटिंग हंगाम 2022-23 मध्ये, सरकारने हरभऱ्याचा एमएसपी प्रति क्विंटल 5230 रुपये निश्चित केला आहे.

यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी कृषीमंत्री पटेल यांचा फळे देऊन गौरव केला. यावेळी जिल्हाधिकारी ऋषी गर्ग, कृषी उपसंचालक एम.पी.एस.चंद्रावत यांच्यासह सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पटेल म्हणाले की, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला आहे. राज्य सरकारही या दिशेने काम करत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नवनवीन निर्णय घेत असून, त्यामुळे पिकांच्या खर्चात घट होत असून कृषी उत्पादनात वाढ होत आहे.

 

गव्हापूर्वी हरभरा खरेदी

राज्यात प्रथमच गव्हापूर्वी हरभरा शासकीय खरेदी सुरू होत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. पटेल म्हणाले की, शेती हा फायदेशीर व्यवसाय करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास पीक विम्याअंतर्गत विम्याचा दावा केला जातो, तसेच महसूल पुस्तक परिपत्रकातील अद्ययावत तरतुदींनुसार शेतकऱ्यांना वेगळी मदत रक्कम दिली जाते.

हेही वाचा : Breaking News: कृषी विभागात घोटाळा! काँग्रेस नेत्यांनी केली 'इडी'कडे तक्रार

कोणते पीक किती दराने विकत घेणार?

यावेळी पटेल यांनी सांगितले की, मध्य प्रदेश सरकारने कृषी विभागामार्फत ८ लाख मेट्रिक टन हरभरा, ५ लाख मेट्रिक टन मोहरी आणि दीड ते दोन लाख मेट्रिक टन मसूर खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वेळी राज्यात शेतकऱ्यांनी हरभरा आणि गव्हाची चांगली लागवड केली होती. या वेळी राज्यात हरभरा पीक बंपर आले आहे. बाजारात आधारभूत किमतीपेक्षा अधिक भावाने मोहरी व मसूर खरेदी केली जात आहे.

English Summary: In Madhya Pradesh, purchase of gram and mustard on MSP has started, said the Agriculture Minister
Published on: 25 March 2022, 05:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)