News

यावर्षी सातत्याने निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. खरीप हंगामात देखील अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाची पिके वाया गेली. त्यामुळे सोयाबीन आणि कापसासारख्या प्रमुख पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली.

Updated on 13 February, 2022 9:35 AM IST

यावर्षी सातत्याने निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. खरीप हंगामात देखील अतिवृष्टी झाल्यामुळे खरिपाची पिके वाया गेली. त्यामुळे सोयाबीन आणि कापसासारख्या प्रमुख पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली.

त्यामुळे सोयाबीन सारखे पिकाची आवक हवी तेवढीझालीच नाही. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या चार दिवसापासून हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. आवक सुरू झाल्यानंतर चौथ्याच दिवशी हरभऱ्याची आवक हीपंधरा हजार पोत्यांवर  गेली आहे. तसेच अंतिम टप्प्यातील सोयाबीनची विक्री देखील मोठ्या प्रमाणे होत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पंधरा हजार पोती हरभरा तर 17पोती  सोयाबीन ची आवकझाली. रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक सुरू झाली असून त्यासोबतच या वर्षी हरभऱ्याचे पेरणी क्षेत्रात वाढ झाल्याने सध्या मोठ्या प्रमाणात हरभरा बाजारपेठेत दाखल होत आहे.

परंतु बाजारामध्ये हरभऱ्याचे दर मात्र घटलेले आहेत. सध्याच्या हरभरा च्या भावाचा विचार केला तर प्रति क्विंटल चार हजार 400 रुपयांपर्यंत हरभऱ्याला भाव मिळत आहे. आणि शासनाने ठरवून दिलेला हमीभाव हा पाच हजार चारशे रुपये आहे.त्यामुळे लवकरात लवकरहरभऱ्याच्या खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करावीत अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

 सोयाबीनचे स्थिती                                        

 सध्या खरीप हंगामातील सोयाबीन अंतिम टप्प्यात असून भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेले सोयाबीन देखील आता शेतकऱ्यांनी विक्रीला सुरुवात केली आहे. 

सध्या सोयाबीनला 6400 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा आहे परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याप्रमाणे मागणी नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता शेतकरी साठवलेल्या सोयाबीन देखील विक्रीसाठी बाजारपेठेत आणत आहेत.

English Summary: in latur krushi utpanna bajar samiti start incoming of gram ccrop
Published on: 13 February 2022, 09:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)