News

नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच पिंपळगाव बसवंत व लासलगाव या दोन मोठ्या बाजार समिती नाशिक जिल्ह्यात आहेत. या दोन्ही बाजार समितीत पैकी लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून गेल्या सप्ताहात लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आवारात लाल कांद्याचे तब्बल एक लाख 26 हजार 462 क्विंटल आवक झाली.

Updated on 18 January, 2022 9:39 AM IST

नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच पिंपळगाव बसवंत व लासलगाव या दोन मोठ्या बाजार समिती नाशिक जिल्ह्यात आहेत. या दोन्ही बाजार समितीत पैकी लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून गेल्या सप्ताहात लासलगाव बाजार समितीच्या मुख्य आवारात लाल कांद्याचे तब्बल एक लाख 26 हजार 462 क्विंटल आवक झाली.

कांद्याला बाजार भाव कमीत कमी सातशे तर जास्तीत जास्त 2564 सरासरी दोन हजार दहा रुपये प्रति क्विंटल मिळाला. जानेवारी महिन्याच्या पहिल्या 12 दिवसांमध्ये लासलगाव बाजार समितीत सुमारे चार लाख 40 हजार क्विंटल आवक झाली आहे.  या प्रमाणात आवक वाढण्यामागे अमावस्या, शनिवार व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बंद असलेले कांदा लिलाव पुन्हा सुरू केल्याने ही आवक वाढली.

एकटा लासलगाव बाजार समिती चा विचार केला तर येथे दररोज 50 ते 55 हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे दररोज होणाऱ्या उलाढालीत वाढ झाली असून मागच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन लाख क्विंटल पेक्षा जास्त आवक यावर्षी झाली असल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समिती अपेक्षा लासलगाव मध्ये कांदा विक्री कडे शेतकऱ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. कांद्याला बोलणारा सर्वाधिक भाव आणि सरासरी भाव हेदेखील लासलगाव मार्केट मध्ये चांगले मिळत असल्याने कांद्याची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असून आवक वाढत आहे. 

या अगोदर लासलगाव बाजार समिती चा विचार केला तर ही बाजार समिती अमावस्याला तसेच शनिवारी व सार्वजनिक  सुट्ट्यांच्या दिवशी कांदा लिलाव बंद असायचे, मात्र या जुन्या परंपरा कुठेतरी बदलल्या पाहिजे या हेतूने व्यापारी वर्गाने या सुट्ट्या बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दिवशी देखील बंद असलेले कांदा लिलाव सुरु केल्याने येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढू लागली आहे.

English Summary: in lasalgaon onion market growth of incoming of onion in huge quantaty
Published on: 18 January 2022, 09:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)