सध्या शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात येत आहे. शेतीमध्ये ड्रोन चा वापराला चालना देण्याच्या विषयीचे योजनादेखील निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात मांडली. शेतीमध्ये ड्रोनचा वापर हा एक मजूर टंचाईने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकतो.
असाच एक प्रयोग लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे एका शेतकऱ्यांनी शेतामध्ये ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी चा प्रयोग यशस्वी केला. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
लाखनी तालुक्यातील जवनाळा येथील प्रगतिशील शेतकरी विनायक बुरडेयांच्या शेतात हा प्रयोग करण्यात आला. या जिल्ह्यांमध्ये धाना सोबत भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु शेतीसाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. पिकांवर फवारणी च्या कामाला तर कुणीही येत नाही. या सगळ्या समस्या वर उपाय म्हणून बुरडेयांच्या शेतात कीटक नाशक फवारणी चा ड्रोनद्वारे करण्याचा प्रयोग यशस्वी करण्यात आला. त्यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यामध्ये वेळ,कीटकनाशक तसेच मनुष्यबळ आणि पैशांची बचत होते असे सांगण्यात आले.
या प्रयोगाला माऊली ग्रीन आर्मी चे मिळाले सहकार्य…
जवनाळा येथील शेतकरी विनायक बुरडे यांच्या शेतात किसान ड्रोन, माऊली ग्रीन आर्मी, महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती आणि आयोटेक वर्ड एरीकेशन च्या वतीने हा प्रयोग यशस्वी रित्या सादर करण्यात आला. टोमॅटो, मिरची आणि वांग्याच्या शेती व ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली. या माध्यमातून असे दिसून आले की ही फवारणी अगदी कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळात होत असल्याचे समजले. ज्या शेतकऱ्यांना किंवा बचत गटांना मजूरटंचाईवर सामना करण्यासाठी ड्रोनचीखरेदी करायचे असेल अशांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज सुविधा उपलब्ध करून देईल असे बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी सांगितले.
ड्रोनच्या मदतीने एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य असल्याचे यावेळी दिसून आले. यामध्ये एकाच ठिकाणी उभे राहून पाच एकर चे फवारणी रिमोटच्या सहाय्याने ड्रोनद्वारे करता येऊ शकते. 30 मीटर उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोन मध्ये दहा लिटर कीटकनाशक साठवण्याची क्षमता आहे. एकाच वेळी 4 नोझल द्वारे ही फवारणी करता येते.(स्त्रोत-लोकमत)
Published on: 03 February 2022, 11:41 IST