News

महाराष्ट्राची तसेच भारताची शान असलेला हापूस आंब्याला कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी मुहूर्ताच्या सौद्यात चक्क देवगड हापूस आंब्याच्या पाच डझन च्या पेटीला चाळीस हजार पाचशे 99 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला.

Updated on 10 February, 2022 12:42 PM IST

महाराष्ट्राची तसेच भारताची शान असलेला हापूस आंब्याला कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी मुहूर्ताच्या सौद्यात चक्क देवगड हापूस आंब्याच्या पाच डझन च्या पेटीला चाळीस हजार पाचशे 99 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला.

यावर्षी अतिवृष्टी झाली होती. त्यातच नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे यंदा हापूस आंबा बाजारात यायला उशीर होईल अशी एक शंका व्यापारी वर्गांमध्ये होती. परंतु या वर्षीचा हंगाम मार्च महिन्याच्या मध्यावर सुरू होईल परंतु फेब्रुवारी महिन्यात हापूस आंबा कोल्हापूर बाजार समिती मध्ये दाखल झाला.या बाजार समितीमध्ये हापुस  आंब्याच्या तीन पेट्यांची आवक होऊन देवगड येथील आंबा उत्पादक शेतकरी सचिन आणि सुहास गोवेकर यांनी पाच दजन आंब्याच्या तीन पेट्या पाठवले होते.

बुधवारी झालेल्या मुहूर्ताच्या सौद्यात या पाच डझन आंब्यांच्या पेटीला 40 हजार 599 इतका सर्वाधिक भाव मिळाला. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती चे अशासकीय प्रशासक मंडळाचे अध्यक्ष के पी पाटील, सचिव जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे सौदे पार पडले. या दराप्रमाणे एक आंबा हा 676 रुपयांना पडला. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही पश्‍चिम महाराष्ट्राची मध्यवर्ती बाजारपेठ मानली जाते. 

त्यामुळे कोकण विभागात होणारा आंबा प्रथम मुंबई आणि नंतर कोल्हापूर बाजारात दाखल होतो. मुंबईमध्ये आंब्याला पोषक वातावरण असल्यामुळे या ठिकाणी कच्चा आंबा पाठवला तरी दोन-चार दिवसात परिपक्व होतो. हा थांबा कोल्हापूरला पक्व होण्यासाठी किमान आठ दिवस थांबावे लागते.

English Summary: in kolhapur market comitee get highest rate to haapus mango
Published on: 10 February 2022, 12:42 IST