News

राज्यामध्ये हवामान कोरडे असून तापमानात अंशतः वाढ झाली असली तरी वातावरणात कमालीचा गारठा आहे.

Updated on 18 January, 2022 5:42 PM IST

 राज्यामध्ये हवामान कोरडे असून तापमानात अंशतः वाढ झाली असली तरी वातावरणात कमालीचा गारठा आहे.

खानदेश तसेच विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आगामी दोन दिवस दाटधुके आहे तसेच 21 आणि 22 जानेवारीला खानदेश सोबतच विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.नाशिक जिल्ह्यातदेवळा, निफाड,येवला तसेच चांदवड तालुक्यामध्ये दाट धुके पसरले होते. हवामान तज्ञ माणीकराव खुळे यांनी ही माहिती दिली. आधीच विदर्भामध्ये गारपीट झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात सोमवारी विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये खानदेश भागात थंडी  काहीशी अधिक तर कोकण सोबतच दक्षिण मध्य महाराष्ट्र,सातारा,सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर मधे थंडी कमी जाणवेल. उर्वरित महाराष्ट्रात हळूहळू ढगाळ वातावरण निवळण्याची अपेक्षा आहे. रब्बी पिकांसाठी आठवडाभर वातावरण काहीसे पोषक असून  खानदेश मधील अक्कल्कुवा,शहादा,चोपडा, शिरपूर तसेच यावल आणि 

विदर्भातील जामोद,धामणी, चिखलदरा,  वरुड आणि सभोवतालच्या परिसरात पुढील दोन दिवस दाट धुके तर 21 आणि 22 ला तुरळक ठिकाणी किंचितशी गारपीट होऊ शकते.

English Summary: in khandesh and vidharbha more mor and very cold situation in this area
Published on: 18 January 2022, 05:42 IST