2022 या नववर्षाला (To the new year) नुकतीच सुरुवात झाली आहे, या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात नेमके कोणकोणते बदल होणार आहेत याविषयी माहिती असणे अनिवार्य आहे. जर आपणास या महिन्यात काही महत्त्वाची बँकेविषयी कामे करायची असतील, काही पैशांचे व्यवहार करायचे असतील, तर आपणांस बँक किती दिवस चालू राहील हे देखील जाणुन घेणे महत्वाचे आहे. जर आपणासही याविषयी जाणुन घ्यायचे असेल तर आजची बातमी विशेष तुमच्यासाठी कारण की जानेवारी 2022 मध्ये बँकेला तब्बल 16 दिवस सुट्ट्या असणार आहेत. म्हणजे बँका केवळ 15 दिवस कामकाज करतील आणि इतर दिवस राष्ट्रीय सण, राज्यस्तरीय सण, आणि वीकेण्डच्या सुट्टया असणार आहेत.
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आपल्या देशात अनेक धर्म जात, पंथ आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. म्हणुन प्रत्येक राज्यात प्रत्येक सण साजराच होईल असं नाही, त्यामुळे सर्वच बँका 16 दिवस बंद राहतील असं नाही. काही बँका ह्या त्यापेक्षा कमी दिवस बंद असतील मात्र विकेंडला सर्वच बँका बंद असतील. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया जानेवारी महिन्यातील (In the month of January) 16 दिवसांच्या सुट्ट्या आणि कोणते राष्ट्रीय सण ह्या दिवसात येणार आहेत याविषयी देखील जाणुन घेऊया.
1 जानेवारी 2022: नवीन वर्षाचा पहिला दिवस (The first day of the new year) या दिवशी आयझॉल, गंगटोक, चेन्नई, शिलाँग या राज्यात बँकाना सुट्ट्या असतील.
3 जानेवारी 2022: या दिवशी सिक्कीममध्ये लोसुंग (Losung) हा नवीन वर्षाचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सिक्कीममध्ये बँका बंद असू शकतात.
4 जानेवारी 2022: लोसुंग असल्यामुळे गंगटोक, आयझॉल या ठिकाणी बँकाना सुट्ट्या असतील.
11 जानेवारी 2022: मिशनरी डे (Missionary Day) निमित्ताने मिझोरम राज्यात सुट्ट्या असतील.
12 जानेवारी 2022: स्वामी विवेकानंद जयंती (Swami Vivekananda Jayanti) निमित्त कोलकाता म्हणजे बंगाल मध्ये सुट्ट्या असतील. तस बघायला गेलं तर हा दिवस संपूर्ण देशात पाळला जातो.
14 जानेवारी 2022: मकर संक्रांती / पोंगल यामुळे राज्यात मकरंसंक्रात (Makran Sankranti) निमित्त सुट्टी असेल. तसेच तामिळनाडू, पुडुचेरी, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यात सुट्ट्या असतील.
15 जानेवारी 2022: उत्तरायण पुण्यकाळातील मकर संक्रांती / माघा संक्रांती / संक्रांती / पोंगल / तिरुवल्लुवर दिवस यामुळे अनेक राज्यात सुट्टी असेल.
18 जानेवारी 2022: थाई पुसम ह्या दिवशी तामिळनाडू राज्यात सुट्ट्या असतील.
26 जानेवारी 2022: देशाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) हा राष्ट्रीय सण आहे या दिवशी संपूर्ण देशात सुट्टी असेल.
Published on: 03 January 2022, 10:19 IST