ऑक्टोबर महिन्याच्या शेडचे नुकसान झाल्याची तक्रार आल्यावर त्याची पाहणी मार्च महिन्यात, गोपीनाथ मुंडे अपघात विमा या सर्व मुद्द्यांवरून कृषी मंत्री दादा भुसे त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
यासंबंधीच्या सविस्तर वृत्त असे की जालना जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर तसेच जालना जिल्हा परिषदेचे सीईओ मनोज जिंदल इत्यादी मान्यवरांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
नक्की वाचा:२३ लाखांना खरेदी केला काळा घोडा, घरी आल्यावर धक्काच बसला, वाचा नेमकं काय घडलं
या बैठकीमध्ये तीनही जिल्ह्यातील खरीप हंगामाचे क्षेत्र, पर्जन्यमान तसेच बियाणे आणि खते यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीमध्ये गोपीनाथ मुंडे अपघात विमा चे प्रस्ताव मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत या मुद्द्यावरून कृषी मंत्री दादा भुसे संतापले.
त्यांनी भर बैठकीत विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना उठवून चांगलीच कानउघडणी केली तसेच अक्कल गहाण ठेवून काम न करण्याच्या सूचना देखील या बैठकीत दिल्याने एकच खळबळ उडाली. यामध्ये बदनापूर तालुक्यातील शेडनेट बाबत दिलेल्या तक्रारीवरूनही अधिकारी यांना त्यांनी चांगलेच खडसावले. तसेच संबंधित प्रकरणाची चौकशी करून ज्या अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाईचे निर्देश दिले.
नक्की वाचा:आता गाय पाळण्यासाठी घ्यावा लागणार परवाना, जाणून घ्या काय आहे हा नवा नियम
शिल्लक ऊसा बाबत काय म्हणाले कृषिमंत्री?
शासनस्तरावर शिल्लक उसाचे नियोजन केले असून शेतकऱ्यांनी धीर न सोडण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच जालनातील सीडस पार्कचा प्रस्ताव मार्गी लागणार असल्याचे सांगून कापूस, सोयाबीनच्या क्लस्टरसाठी एक हजार कोटींची तरतूद आहे.
अंमलबजावणी या खरीप हंगामापासून केली जाईल असे देखील त्यांनी सांगितले. त्यासोबतच ओवा, तुळस यासारख्या औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे शेतकरी वळत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. एवढेच नाही तर हिंगोली जिल्ह्यातील हळदप्रकल्पा सोबत तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पंतप्रधान अन्नसुरक्षा योजनेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
Published on: 23 April 2022, 07:43 IST