मागच्या वर्षी म्हणजे खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे खानदेशातील शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आल्याचे चित्र नजरेस पडले होते. जळगाव जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने खरिपात हाहाकार माजवला होता. जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशी लागवड केली जाते, जिल्ह्याचे हे एक मुख्य पीक आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कापसावर अवलंबून आहेत. जिल्ह्यातील मुख्य पिकासमवेतच ज्वारी मका बाजरी इत्यादी पिके खरीप हंगामात पूर्णतः मातीमोल झाली होती. त्यामुळे रब्बी हंगामात देखील शेतकरी बांधव गहू ज्वारी मका इत्यादी पिकांची पेरणी करताना नजरेस पडत आहेत. जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वात जास्त पेरणी चोपडा तालुक्यात झाले असल्याचे समोर येत आहे, तर जिल्ह्यात सर्वात कमी पेरणी बोदवड तालुक्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उत्पादन वाढीची आशा आहे. जिल्ह्यात सर्वत्र हवामान थंड आणि कोरडे असल्याने रब्बी हंगामातील पिके वाढीसाठी पोषक वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीपासून 13 ते 23 तापमाण कायम राहिले आहे.
कृषी वैज्ञानिकांच्या मते, जिल्ह्यातील वातावरण आणि तापमान रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी पोषक असून यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या थंड वातावरण असल्याने रब्बी हंगामातील गहू हरभरा भुईमूग इत्यादी पिकांना यामुळे पोषक वातावरण प्राप्त होत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील जवळपास सर्वच पिकेजोमदार वाढीसाठी तयार होताना दिसत आहेत. जळगाव जिल्ह्यात जवळपास दोन लाख 38 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त गव्हाची पेरणी झाल्याचे सांगितले जात आहे, हाती आलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात जवळपास 83 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील हरभरा पिकाचा पेरा झाला आहे.
जिल्ह्यात गव्हाच्या क्षेत्रात देखील वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे, आतापर्यंत जिल्ह्यात 45 हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झाला आहे. जिल्ह्यातील रावेर आणि चोपडा तालुक्यात गव्हाचा सर्वाधिक पेरा असल्याचे सांगितले जात आहे. रब्बी हंगामातील जवळपास सर्वच पिकांसाठी पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाततुन चांगल्या उत्पादनाची आशा आहे.
Published on: 21 January 2022, 06:44 IST