जळगाव जिल्ह्यातील आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांनी 2020 आणि 21 या वर्षासाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेच्या माध्यमातून केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे
परंतु यामध्ये अनेकदा उत्पादकांकडून काहींनी पैसे उकळून फसवणूक केल्याच्या तक्रारी संबंधित विमा कंपनीकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून अशा पद्धतीने पैसे उकळणारे रॅकेट सक्रिय आहे का? हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की,बजाज आलियांज या विमा कंपनीची 2020-21 साठी फळपिक विमा योजना संबंधी नियुक्ती करण्यात आली होती.
यावर्षी जवळजवळ 49 हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले होते. परंतु चालू वर्षांमध्ये विमा परताव्या संबंधीचे निकषबदलण्यात आली. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा परतावे या वर्षा संबंधी मिळू शकले नाहीत. त्यामुळे काहींनी गारपीट, वेगाचा वारा यासंबंधीचे सर्वेक्षण करून घेण्यासहइतर नुकसानीचे परतावे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक शेतकऱ्यांकडून काही पैसे उकळले आहेत. याबाबत विमा कंपनीकडे तक्रार दाखल झाले असून पैसे उकळले पण परतावे न मिळाल्याने या तक्रारी विमा कंपनी कडे पोहोचविण्यात आल्याची माहिती आहे
.पण या प्राप्त तक्रारी बाबत पुढे काय कार्यवाही करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंबंधी संबंधित विमा कंपनीने शेतकऱ्यांनी भूलथापांना बळी पडू नका,विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांकडून सर्वेक्षण किंवा इतर बाबींसाठी पैशांची मागणी केली जात नाही असे एका निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.(स्त्रोत-ॲग्रोवन)
Published on: 01 February 2022, 01:08 IST