News

पुणे : मागच्या काही वर्षात इस्रायलने कृषी क्षेत्रात प्रचंड मजल मारली आहे. पाणी आणि जमीन कमी असताना आज इस्रायल फळे, भाज्या यांची निर्यात करतो. इस्रायलमधील एक कंपनीने शेतकऱ्यांसाठी असे एक सॉफ्टवेअर तयार केले त्यातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना किती प्रमाणात, केव्हा पाणी द्यायचे हे लक्षात येते

Updated on 28 August, 2020 12:00 AM IST


पुणे : मागच्या काही वर्षात इस्रायलने कृषी क्षेत्रात प्रचंड  मजल मारली आहे. पाणी आणि जमीन कमी असताना आज इस्रायल  फळे, भाज्या  यांची  निर्यात करतो. इस्रायलमधील  एक कंपनीने शेतकऱ्यांसाठी असे  एक सॉफ्टवेअर  तयार केले  त्यातून  शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना  किती प्रमाणात, केव्हा पाणी द्यायचे  हे  लक्षात येते. त्यामुळे पाण्याची बचत होऊन  शेतीतील  उत्पादन  वाढल्याचे  कंपनीने म्हटले आहे. इस्रायलमधील मन्ना इरिगेशनने  हे  सॉफ्टवेअर  विकसित केले आहे.  या त्यांनी आतापर्यंत ५० पिकांवर हा प्रयोग यश्वी करून  दाखवला आहे. त्यामुळे पिकांची उत्पादकता १०% ने वाढली असल्याचा कंपनीने दावा केला आहे.

नेमकं  हे सॉफ्टवेअर कसे  काम  करते  हे आपण  पाहूया. हे सॉफ्टवेअर असून उपग्रहाद्वारे म्हणजेच  सॅटेलाईटद्वारे  मिळालेली  माहिती,  त्या भागातील  हवामानस्थानिक हवामान याद्वारे  पिकाचा अभ्यास  करते. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पिकाची आताची परिस्थितीपिकाचा जोमपाण्याची गरज याचा अभ्यास  केला जातो. स्थानिक हवामान केंद्राच्या माध्यमातून सर्व  माहिती गोळा केली जाते. ती माहितीमातीची स्थिती, आणि  त्या पिकाला देण्यात  करण्यात येणारे सिंचन (  उदा. तुषार, ठिबक)  यांच्याशी जुळवून   शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासाठी किती पाणी लागणार केव्हा पाणी लागणार यांची   माहिती  कळते.

या सॉफ्टवेअरचे  फायदे

१)  पिकांना नेमके केव्हा आणि   कधी पाणी  लागणार याची माहिती कळते.

२) उपग्रहाच्या माध्यमातून नियमित फोतो येत असल्याने  पिकांची परिस्थिती   कळणार

३) यामुळे  पाण्याची बचत होऊन, पिकाची  उत्पादनक्षमता वाढते.

४)  वातावरण बदल आणि पाण्याची  कमतरता यामुळे  नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवीन शेती करण्याच्या पदतीना चालना मिळते.

English Summary: In Israel, crops are watered by mobile advice
Published on: 27 August 2020, 11:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)