News

सोयाबीन दराचा यावर्षी विचार केला तर कायम चढ-उतार पाहायला मिळत आहे. या वर्षी सोयाबिनच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आल्याने तसेच शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्रीस आणल्याने सोयाबीनचे बाजार भाव बऱ्यापैकी टिकून राहिले.

Updated on 10 February, 2022 12:55 PM IST

सोयाबीन दराचा यावर्षी विचार केला तर कायम चढ-उतार पाहायला मिळत आहे. या वर्षी सोयाबिनच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आल्याने तसेच  शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्रीस आणल्याने सोयाबीनचे बाजार भाव बऱ्यापैकी टिकून राहिले.

या बाबतीत आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात तेजी दिसून येत आहे. यामध्ये जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला चीन हासोयाबीनची मोठी गरज असलेला देश आहे. जर जगातील सोयाबीन उत्पादक देशांचा विचार केला तर उरुग्वे, पॅराग्वे, अर्जेंटिना, ब्राझील आणि अमेरिका या देशांमध्ये सोयाबीनचे चांगले उत्पादन घेतात. तसेच या देशांमधून सोयाबीनची निर्यात देखील मोठ्या प्रमाणात केले जाते. परंतु वर उल्लेख केलेल्या देशांमध्ये सोयाबीनचे उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीनची तूट पडेल त्यामुळे भविष्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेक मोठ्या कंपन्या सोयाबीन मध्ये पैसे गुंतवत आहेत. त्यासोबतच चीनची सोयाबीनची खरेदी ही सुरूच आहे. या सगळ्या परिस्थितीचा परिणाम हा सीबॉट वर पाहायला मिळत आहे. सीबॉट अर्थात शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड मध्ये सोयाबीन दर तेजीत आहेत. मंगळवारचा विचार केला तर सोयाबीन वायदे 1584 सेंट प्रति बुशेल्सवर पोहोचले होते.

 उत्पादन घटनेचा फायदा मिळेल अमेरिकेला

 ब्राझील, उरुग्वे, अर्जेंटिना इत्यादी देशातील दुष्काळी परिस्थिती तसेच त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट आली आहे अर्जेंटिना आणि ब्राझील मध्ये तर आठवड्याला उत्पादनातील घटीचा अंदाज व्यक्त होत आहे. ब्राझीलचा विचार केला तर येथील सोयाबीन उत्पादनाचा सरकारी अंदाज 1300 लाख टनांवर येऊ शकतो अशी शक्यता येथील काही कमोडीटी एक्सपर्टने व्यक्त केले आहे. ब्राझील मधील एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 18 टक्के उत्पादन रियो ग्रांदे दो सुल या राज्यात होते.  या राज्यातील सोयाबीनला मोठा फटका बसला असून मागील महिन्यातील अहवालात यु एस डी ए नेम ब्राझीलमध्ये 1350 लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. 

या सगळ्या परिस्थितीमुळे चीनला आता अमेरिकेकडे वळावे लागत आहे. भविष्यामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांमध्ये जर सोयाबीनच्या उत्पादनात घट आली तर दर वाढ होईल.या अंदाजाने अमेरिकेचा सोयाबीन बाजार तेजीत आहे.स्पेकुलेटर सक्रिय झाले असून सोयाबीन खरेदी करत आहेत तसेच सी बोट वरील वायदा मध्ये देखील खरेदीत  वाढ झाली आहे.

English Summary: in international market soyabioen rate in growth due to decrease in producction
Published on: 10 February 2022, 12:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)