मका हे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जर आपण मक्याचा उपयोग पाहिला तर अनेक औद्योगिक उत्पादनांमध्ये मक्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु जर आपण मागील एक ते दोन वर्षाचा विचार केला तर मका लागवड क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रकारची घट झाल्याचे बघायला मिळत आहे.
जर आपण एकंदरीत मक्याच्या बाजारभावाचा विचार केला तर सद्यस्थितीत प्रतिक्विंटल 2500 ते 2 हजार 600 पर्यंत सरासरी भाव मिळत आहे. परंतु येणारा काळ मक्यासाठी कसा राहील? सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मक्याचे स्थिती नेमकी काय आहे?याबद्दल या लेखामध्ये आपण माहिती घेऊ.
मक्याची एकंदरीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती
जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर ऑगस्ट महिन्याच्या अगदी शेवटी मक्याच्या बाजार भावात थोडी नरमाई आल्याचे बघायला मिळाले. देशांतर्गत बाजारपेठेत देखील मक्याचे भाव क्विंटलमागे दोनशे रुपयांपर्यंत घसरले होते.
जर आपण सध्याच्या दराचा विचार केला तर दोन हजार 500 पर्यंत सरासरी भाव मक्याला मिळत आहे. जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर गेल्या आठवड्यात मका दरवाढ झालेली बघायला मिळाली. परंतु यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या कृषी विभागाने या वर्षी जागतिक मका उत्पादन कमी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे वर या अंदाजाचा परिणाम संपूर्ण आठवडाभर मका बाजारावर दिसला.
आपण अमेरिकेच्या कृषी विभागाचा अहवाल पाहिला तर त्यानुसार जागतिक मका उत्पादन मागच्या वर्षीपेक्षा तब्बल 47 दशलक्ष टनांनी कमी राहील.
नक्की वाचा:Cotton Crop: कपाशीवर दिसत आहे आकस्मिक मर रोग, 'या' उपाययोजना ठरतील परिणामकारक
अमेरिकेमध्ये दुष्काळाचा फटका हा मका पिकाला बसल्यामुळे तेथील मका उत्पादन 30 दशलक्ष टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर युरोपियन युनियन मध्ये देखील मका उत्पादनांमध्ये 12 दशलक्ष टनांनी घट येण्याचा अंदाज आहे. अमेरिकेचा कृषी विभागाचा अहवालानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मकाच्या भावात दिड टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली.
आपल्या भारताचा विचार केला तर आपल्याकडे देखील पावसाचा फटका बसल्यामुळे उत्पादन कमी करण्याचा एक अंदाज आहे. त्यामुळे येणारा काळ हा मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक असू शकतो व मक्याचे भाव टिकून राहतील असा देखील अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
नक्की वाचा:डीएपी आणि युरिया खतांच्या किमती वाढणार? मोठी माहिती समोर! जाणून घ्या खतांच्या किमती
Published on: 18 September 2022, 01:19 IST