यावर्षी अपेक्षेपेक्षा कापसाचे उत्पादन फारच कमी होईल त्यामुळे कापसाचे दर वाढू शकतात असा अंदाज आहे.त्याला जास्तीचा पाऊस, पुरामुळे झालेले कपाशी पिकाचे अतोनात नुकसान अशा बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत.
कापूस हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. परंतु या वर्षी कापूस उत्पादन कमी होण्याचा अंदाज असल्याने सुती कापड यांच्या दरामध्ये देखील वाढ होऊ शकते. याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.
कापसाचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण?
मागच्या वर्षीच्या कापूस लागवड क्षेत्राचा विचार केला तर त्या तुलनेत या वर्षी 6 टक्के कमी क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे. गरजेपेक्षा कमी उत्पादन झाल्याने कापसाचे भाव वाढले आहेत.
जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सन 2011 नंतर सरासरी एक पाउंड किमती झाल्या. भारतामध्ये देखील 10 ते 12 टक्के वाढ झाली आहे.सध्याच्या कापसाच्या भावाचा विचार केला तर तो सहा हजार पाचशे ते7 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत आहे सरकारी हमी भाव कापसाला पाच हजार 725 रुपये प्रतिक्विंटल आहे.सगळ्यात अजून दुसरे महत्त्वाचे कापसाचा भाव वाढले मागील आंतराष्ट्रीय कारण म्हणजे अमेरिकेमध्ये देखील जास्त पावसामुळे कापसाचे पूर्ण नुकसान झाले आहे. तसेच चीन मध्ये देखील कापसाला मोठी मागणी आहे त्यामुळे यार्न फायबरचे मागणी मजबूत राहू शकते.
शेतकरी राजांना होईल फायदा
कापसाचा भाव वाढले याचा फायदा शेतकरी राज्याना मिळणार आहे.बाजारातकापसाचा भाव सहा हजार 500 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपये अधिक मिळणार आहेत. कापसाचा शासकीय भावा पाच हजार 750 रुपये प्रति क्विंटल आहे.
Published on: 29 September 2021, 03:00 IST