शेतकरी शेती बरोबर दुधव्यसाय देखील करत असतो जे की यामुळे त्याला आर्थिकरित्या जास्त टंचाई भासत नाही. जे की अगदी भविष्यात शेतीचे चित्र बदलेल, दूध डेअरी चे चित्र देखील बदलेल मात्र भारतीय शेतकरी कधीच मागे पडणार नाही. भारत देश हा दूध उत्पादनमध्ये प्रथम देश बनलेला आहे जे की ही धवलक्रांतीची पहिली स्टेज होती. मात्र दुधावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचा दुसरा टप्पा अजून पूर्ण झालेला नाही. जे की या टप्प्याला सुरुवात झाली आहे मात्र अजून विस्तार झालेला नाही.
दिवसेंदिवस पशूंची संख्या होतेय कमी :-
सध्या शिक्षणावर भर देत असल्याने तरुण वर्ग नोकरी, व्यवसायाकडे ओळत आहे म्हणजेच नवीन पिढी गोट्यात काम करायला नको म्हणत आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गावामध्ये गोठा बांधण्यासाठी जागा सुद्धा शिल्लक राहिलेली नाही. पशुसाठी लागणारा चारा, पशुखाद्य महागले आहे तसेच पशूंची संख्या सुद्धा दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे.
भविष्यात दूध काढण्यासाठी रोबोटीक यंत्राचा वापर :-
भारत हा खूप मोठा देश आहे. जे की पशूला अगदी घरच्या माणसासारखे सांभाळणे तसेच त्याला वेळोवेळां चारा देणे त्याचे व्यवस्थित रित्या संगोपन करणे खूप महत्वाचे आहे आणि भारतातही शेतकरी अगदी व्यवस्थितपणे सर्व कामे करत आहे. जे की सर्व शेतकरी एकत्र येऊन स्वतः समूह तयार करून दूध कंपन्या देखील काढतील. जे की हेच शेतकरी मोठ्या कंपनीसोबत मोठा करार देखील करतील. एवढेच नाही तर भविष्यात दूध काढण्यासाठी देखील रोबोटीक प्रणाली वापरली जाईल.
युवाशक्ती व्यवसायास ठरेल फायदेशीर :-
शेती अर्थव्यवस्थाचा दूध उत्पादन हा खरा कणा बनू शकतो. जे की या दूध उत्पादन व्यवसायात शेतकरी निराश होत नाही तसेच शेतकरी आत्महत्या देखील करत नाही. अशा अनेक प्रकारच्या चक्रात यौ सापडत नाही. कारण या गोष्टीचा विचार करायला त्यांना कामातून वेळच भेटत नाही. मात्र शेतकऱ्याची पुढची पिढी देखील त्याच ताकदीने या व्यवसायात उतरायला हवी. युवाशक्ती या व्यवसायाला लाभली तर अजून मोठ्या प्रमाणावर हा व्यवसायाला बळ भेटेल असे सांगण्यात आले आहे.
Published on: 30 September 2022, 05:22 IST