News

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खैरी या गावातील शेतकरी दादाजी फुंडे हे आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत दादाजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिकपणे सेंद्रिय शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. पारंपरिक पिकांच्या शेतीला फाटा देत दादाजी आपल्या आवडत्या पिकांची लागवड शेतीत करत आहेत. दादाजी यांच्या शेतामध्ये त्यांनी १०० मजूर कामगारांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिला आहे.

Updated on 24 January, 2022 6:00 PM IST

परिश्रमाला योग्य नियोजनाची जोड :-

२०२० च्या मधील जून महिन्यात तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावात तसेच उत्तर सोलापूर मधील मार्डी गावामध्ये ५ एकर मध्ये पिंक सुपर वाण जातीच्या पेरू ची लागवड केली होती. वैद्य कुटुंबाने कष्ट तर केलेच होते मात्र त्याबरोबर योग्य प्रकारे नियोजन सुद्धा केले होते.ड्रीप सिंचन, खते तसेच झाडास पाणी उपलब्ध करून सर्व योग्य प्रकारे केले. जवळपास १० हजार पेरूच्या झाडांचे त्यांनी योग्य नियोजनात संगोपन केले आहे. सोमेश वैद्य यांनी शेतीला पाणी कमी पडू नये म्हणून १ एकरात शेततळे बांधले आहे तसेच मुबलक प्रमाणात पाण्याच्या २ विहिरी सुद्धा आहेत.

आंतरपिकांवर कायम भर :-

दादांनी यांनी जमिनीच्या सखल उंच भागात २३ प्लॉट तयार केले आणि चार एकर जागेमध्ये एक शेडनेट तयार करून घेतले. दादाजी यांनी त्यानंतर पारंपरिक आंतरपीक घेत त्यामध्ये भाजीपाल्याची लागवड सुद्धा केली. पांढऱ्या चंदनाची शेती सुद्धा त्यांनी पिकवली. सध्याच्या स्थितीला दादाजी फुंडे यांच्या शेतात सुमारे १०० मजूर काम करत आहेत जे की त्यांना रोजगार प्राप्त करून दिलेला आहे. दादाजी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आणि आपल्या शेतात नवीन प्रयोग करून त्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक नवीन आदर्श उभा केला आहे.

शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण करावे :-

महाराष्ट्र राज्यात धानाचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याला ओळखले जाते. मात्र पारंपरिक शेतीला फाटा देत दादाजी यांनी आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरून सेंद्रिय शेती करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. इतर शेतकऱ्यांनी सुद्धा दादाजी फुंडे यांचे अनुकुरण करावे असे मत आहे. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी पहिले धानाचे उत्पादन घेत होते मात्र आता तेच शेतकरी बागायती शेतीकडे ओळू लागले आहेत तसेच शेतकऱ्यांच्या पत्नी सुदधा त्यांना यामध्ये मोलाची साथ देत आहेत.

English Summary: In Gondia district, this farmer tried a unique experiment on his farm, producing 100 cash crops on 13 acres.
Published on: 24 January 2022, 05:50 IST