News

खरीप सीजन चालूय आणि पावसामुळे हा हंगामाचे उत्पादन उशिरा येणार आहे आणि त्यामुळे कांद्याचा भाव वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची पण आहे, आमच्याकडे असं म्हटलं जात की कांद्याच्या जीवावर कोंबडीचा देखील व्यवहार करू नये, ह्याच कारण म्हणजे भावात होणारी उतारचढ. पण आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी गुड न्युज

Updated on 18 September, 2021 11:37 AM IST

खरीप सीजन चालूय आणि पावसामुळे हा हंगामाचे उत्पादन उशिरा येणार आहे आणि त्यामुळे कांद्याचा भाव वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची पण आहे, आमच्याकडे असं म्हटलं जात की कांद्याच्या जीवावर कोंबडीचा देखील व्यवहार करू नये, ह्याच कारण म्हणजे भावात होणारी उतारचढ. पण आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी गुड न्युज

एका रिपोर्टमध्ये दावा होणार कांदाचे भाववाढ

क्रिसील रिसर्चच्या रिपोर्टमध्ये दावा

ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान कांद्याचे भाव चांगला उच्चाँक गाठणार अशी शक्यता आहे कारण अनिश्चित मान्सूनमुळे या पिकाचे आगमन चांगलेच लांबणीवर पडू शकते. क्रिसिल रिसर्चने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, खरीप पिकाच्या आगमनास विलंब झाल्यामुळे आणि चक्रीवादळ तौतेमुळे बफर स्टॉकमध्ये ठेवलेल्या मालाचे कमी झालेले आयुष्य या दोन घटनेमुळे कांद्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

अहवालानुसार, "2018 च्या तुलनेत या वर्षी कांद्याच्या किमतीत 100 टक्क्यांहून अधिक वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्रात लागवडीच्या वेळी आलेल्या आव्हानांमुळे ह्या वर्षीचा पावसाळी कांदा चक्क 30 रुपये प्रति किलो पार होण्याची शक्यता आहे, म्हणजेच यंदा फक्त लालच कांदा! असंच म्हणावं लागेल असं वाटतेय. तथापि, खरीप 2020 च्या उच्च बेसमुळे ते दरवर्षीपेक्षा (1-5 टक्के) थोडे कमी होईल. लाल कांदा लागवडीसाठी महत्वाचा मानला जाणाऱ्या, ऑगस्टमध्ये मान्सूनच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे कांद्याचे भाव विक्रमी उच्चाँक गाठण्याची शक्यता आहे. क्रिसिल रिसर्चला अपेक्षा आहे की पावसाळी कांद्याचे उत्पादन दरवर्षीपेक्षा तीन टक्क्यांनी वाढेल.

 

 

असं असलं तरी यंदा मात्र महाराष्ट्राच्या कांदा आगमनाला बराच उशीर होण्याची शक्यता आहे.अतिरिक्त क्षेत्र, चांगले उत्पादन, बफर स्टॉक आणि अपेक्षित निर्यात निर्बंध यामुळे किंमतीत किंचित घसरणं होण्याची अपेक्षा आहे. अहवालात म्हटले आहे की, मागील वर्षी याच सणासुदीच्या काळात 2018 च्या सामान्य वर्षाच्या तुलनेत कांद्याचे दर दुप्पट झाले होते कारण असे होते की,अनियमित मान्सूनमुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील खरीप पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. पावसाच्या अनिश्चिततेमुळे लाल कांदा बाजारात ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत येणारे कांदे हे नेहमीपेक्षा 2-3 आठवड्यांनी लांबण्याची शक्यता आहे,

त्यामुळे तोपर्यंत किमतीत थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. कांद्याच्या किमतीतील वाढ रोखण्यासाठी सरकारने देखील अनेक उपाययोजना केल्या आहेत, ज्यात आर्थिक वर्ष 2022 साठी कांद्यासाठी ठेवलेल्या दोन लाख टन बफर स्टॉकचा समावेश आहे. कांद्यासाठी नियोजित बफर स्टॉकपैकी सुमारे 90 टक्के खरेदी करण्यात आली आहे, ज्यामध्ये सर्वात मोठा वाटा महाराष्ट्रातून (0.15 दशलक्ष टन) एवढा आहे.

 

English Summary: in festive season onion rate possible to growth
Published on: 18 September 2021, 11:37 IST