News

या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस यांचे बाजार भाव आपल्या मर्जीनुसार नियंत्रित केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कापसातील त्यांचे अर्थकारण शेतकऱ्यांना समजल्याने यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांनी भाव ठरवण्याचा अधिकार आपल्या हाती घेतले.

Updated on 05 January, 2022 9:30 AM IST

या वर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस यांचे बाजार भाव आपल्या मर्जीनुसार नियंत्रित केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कापसातील त्यांचे अर्थकारण शेतकऱ्यांना समजल्याने यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांनी भाव ठरवण्याचा अधिकार आपल्या हाती घेतले.

त्याचा एकूण परिणाम कापसाचा खुल्या बाजारात आमच्यावर होत असून कापसाचे भाव चांगलेच वधारले आहेत. त्याचपद्धतीने सोयाबीनचे भाव देखील सहा हजाराच्या आसपास आल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

शेतमालाच्या बाजारात हमीभावानंतर खरेदीदार शेतमालाचे भाव ठरवीत असत परंतु यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन असो की कापूस या शेतमालाच्या साठवणुकीवर भर देऊन लागेल गरजेपुरताच माल बाजारपेठेत आणला. त्यामुळे बाजारामध्ये खरेदीदारांची गोची होऊन त्यांचे साठा करण्याची क्षमता असून सुद्धा मालाची आवक कमी झाल्याने त्यांना भाववाढ करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या वर्षी शेतकऱ्यांनी आवक रोखल्याने  बाजारातील आवक मंदावली व त्यामुळे खरेदीदारांना भाव ठेवणे भाग पडले. अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर सर्व जिनिंग-प्रेसिंग मधील कापसाची आवक अत्यल्प आहे.

.दरवर्षीच्या तुलनेत कापसाच्या दररोज होणारे आवकेत तिपटीने घट झाली आहे. कापसाचा भाव हा उतारा बघून ठरवला जातो. एक क्विंटल मागे 35 ते 36 किलो रुई चा उतारा येतो. तर 62 ते 63 किलो सरकी निघते.रुईव सरकीचे प्रमाण प्रति क्विंटल मागे 35 ते 65 असे असायला पाहिजे. कापूस खरेदीदार हे प्रमाण पाहूनच भाव निश्चित करत असे. आता उतारा काढताना पाच क्विंटल मागे एक गाठ असा करण्यात येतो व त्याकरिता  खर्च येतो आठशे रुपये. या खर्चात त्याला क्विंटलमागे 62 किलो सरकी व 35 किलो रुई मिळते.रुईला  दोनशे रुपये किलो तर सरकी ला  40 रुपये किलो भाव घाऊक  बाजारात आहे. तिचा पूर्ण लाभ जिनिंग-प्रेसिंग चालवणाऱ्या खरेदीदारांना होत होता.

लाभाचे  हे अर्थकारण शेतकऱ्यांना समजल्याने आणि खरेदीदाराला अडवून भाव वाढविण्यात भाग पडले आहे. सध्या कापसाला चढे दर मिळू लागले आहेत. व त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागल्याने त्यांना चांगल्या भावाच्या अपेक्षा ठेवली आहे. हे अर्थकारण समजल्याने शेतकऱ्यांनी बाजारातील भाव बघून आवक ठेवली आहे. उत्पादनखर्चावर नफा मिळत असेल तरच आवक वाढवायची  नाही तर  अन्यथा घरातच साठा करून ठेवायचा, ही पद्धत शेतकर्‍यांनी अवलंबल्याने त्याचा फायदा हा भाववाढीवर होताना पाहायला मिळत आहे.

English Summary: in current year farmer know financial matter in cotton that effect on cotton rate growth
Published on: 05 January 2022, 09:27 IST