News

जेव्हा शेतकऱ्यांना शेती कामासाठी पैशांची आवश्यकता असते. तेव्हा हातात पैसे नसल्यामुळे बरेच जण सावकारांच्या आधार घेतातव आपली पैशांची निकड भागवतात. असे पैसे अवाच्या सव्वा व्याजदराने शेतकऱ्यांना दिली जातात. काहीसा असाच प्रकार झरी जामणी तालुक्यात पाहायला मिळत आहे.

Updated on 24 November, 2021 9:44 AM IST

जेव्हा शेतकऱ्यांना शेती कामासाठी पैशांची आवश्यकता असते. तेव्हा हातात पैसे नसल्यामुळे बरेच जण  सावकारांच्या आधार घेतातव आपली पैशांची निकड भागवतात. असे पैसे अवाच्या सव्वा व्याजदराने शेतकऱ्यांना दिली जातात. काहीसा असाच प्रकार झरी जामणी तालुक्यात पाहायला मिळत आहे.

या परिसरात नेमके झाले असे की,जेव्हाशेतकऱ्यांना शेतीसाठी पैशांची आवश्यकता होती तेव्हा कापूस व्यापाऱ्यांनी पैशांच्या बदल्यात कापसाच्या अगोदरच सौदे करून ठेवले. या अगोदर झालेल्या सौद्यामध्ये व्यापाऱ्यांनी प्रतिक्विंटल चार ते पाच हजार रुपये या दराने कापसाचा भाव ठरवून त्याप्रमाणे शेतकऱ्यांना शेती कामासाठी पैसे देऊ केले. परंतु यावर्षी कापसाचे दर चांगल्या पद्धतीने वाढले असले तरी व्यापारी पूर्वी झालेल्या सौद्या नुसार कापसाचे खरेदी करणार असल्याचे शेतकरी सांगत आहे. त्यामुळे कापसाची दरवाढ झाली असली तरी पूर्वी झालेल्या सौदयाप्रमाणेच कापूस खरेदी होणार असल्याने कापूसातएकप्रकारचे सावकार की आल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.

बऱ्याचदा शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या पैशांची गरज ही खासगी व्यापाऱ्यांकडून शेतमाल विक्री करतात तेव्हा हातउसने घेऊन पूर्ण करतात. याच पार्श्‍वभूमीवर झरीजामणी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कापसाची खरेदी विक्री करून व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले. तेव्हा कापसाचे भाव इतके वाढले नव्हते.

आता कापसाचा भाव 8 हजारांवर गेला आहे  आणि येथील शेतकऱ्यांनी प्रति क्विंटल 4000 ते 5000 रुपये दराने सौदे केले होते. त्यामुळे आता कापसाचे भाव वाढून देते शेतकऱ्यांना फायदा होत असून फायदा हा व्यापाऱ्यांनाच होत आहे.

 बाजारात आता कापसाचे भाव वाढल्याने व्यापाऱ्यांची नियत बदलली. कापसाच्या बदल्यात पैसे देतो असे शेतकरी म्हणत असताना देखील व्यापारी मात्र कापूस  खरेदी वरच अडून  बसलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी तर कसं त्याप्रमाणे ठरलेल्या दरात कापसाची विक्री केली आहे.

(संदर्भ- मराठी पेपर)

English Summary: in cotton market enter lender that exploitation of farmer
Published on: 24 November 2021, 09:44 IST