बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या चार-पाच दिवसात राज्यात अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकणातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच मराठवाड्यातील लातूर,परभणी आणि नांदेड तसेच हिंगोली या जिल्ह्यांना मंगळवारी ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे
तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे,पालघर,मुंबई,उस्मानाबाद,औरंगाबाद, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला गेला आहे.
येत्या 48 तासात उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पुढील काही दिवसात राज्यातील बहुतांश भागात जोरदार तेअतीजोरदार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.तसेच मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
येत्या सहा तारखेला पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद या जिल्ह्यांना औरंग्याला देण्यात आला आहे. तर येणाऱ्या आठ तारखेला पालघर, रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान कोकण किनारपट्टीलगत मच्छीमारांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Published on: 05 September 2021, 09:10 IST