वरती दिलेल्या शीर्षक वाचून तुम्ही आश्चर्य़चकित झाला असाल, पण हे खरं आहे. छत्तीसगड राज्यात या दिवसात भाजीचे उत्पादन केले जाते, आणि या भाजीची किंमत गगनाला भिडणारी असते. वर्षाच्या काही महिन्याच्या काळापुरतीच या भाजीची विक्री होते आणि बाजारपेठेतही कमी काळ असते. जे लोक या भाजीचे फायदे जाणून आहेत ते लोक कोणत्याही किंमतीमध्ये ही भाजी घेत असतात. हे वाचून आपल्या मनात आले असेल की, इतकी महाग आणि लोकांच्या पसंतीस उतरलेली भाजी आहे तरी कोणती. त्या भाजीचे नाव काय हे प्रश्न आपल्याला पडले असतील. या भाजीचे नाव आहे, बोंडा.
ही छत्तीसगड राज्यातील सर्वात महत्त्वपुर्ण भाजी आहे. पावसाची सुरुवात होताच बाजारपेठेत बोंडा भाजी आली आहे. या भाजीचे उत्पन्न हे बस्तरमधील जंगलात घेतले जाते. साधारण फक्त दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत याचे उत्पन्न घेतले जाते. यामुळे आदिवासी लोक यादरम्यान या भाजीची विक्री करुन आपली कमाई करत असतात. जर आपण स्थानिक बाजारपेठेतून ही भाजी विकत घेत असाल तर आपल्याला या भाजीसाठी ४०० रुपये एका किलोसाठी द्यावे लागतील. हीच भाजी जर आपण मॉलमध्ये घेतली तर याची किंमत ही मटनापेक्षा महाग होत असते. साधारण एक किलो भाजीसाठी ६०० ते ७०० रुपये मोजावे लागतात.
मॉन्सूनच्या सुरुवातील बाजारात येणाऱ्या बोंडाचा रंग हा गदड असतो, याला जात बोंडा म्हणतात. पावसाळा सुरु होऊ एक महिना उलटला तर या भाजीला लाखडी बोडा म्हटलं जातं. छत्तीसगड राज्यातील सरगुजामध्ये या भाजीला पुटु म्हटलं जातं, तर काही लोक याला पटरस फुटू म्हणतात. काही लोक म्हणतात की, बोडा हे मायक्रोबॉयलोजिकल फंगस आहे. हे वृक्षाच्या खोडातून निघालेल्या रासायिनकतेपासून तयार होते. हे सालच्या पडलेल्या वाळलेल्या पानांवर जिवंत राहते. पावसाळ्य़ात हे जमिनीवर येत असते, त्याला आदिवसी लोक गोळा करतात. ही भाजी चवदार असल्याने लोक या भाजीचे दिवाणे होत असतात. यामुळे कोणतीही किंमत लोक मोजत असतात. या भाजीच्या सेवनांने शरीराला सेल्युलोज आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात.
Published on: 02 July 2020, 02:52 IST