News

महाराष्ट्रात ह्या वर्षी पाण्याचे खुप असामान वितरण झालेले आपल्याला दिसत असेल, ह्या वर्षी काही भागात अतिवृष्टी झाली तर काही भागात नेहमी पेक्षा कमी पाऊस झाला पावसाच्या ह्या लहरीपणामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांचेच नुकसान झालेले दिसत आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट-सप्टेंबर ह्या महिन्यात वरुणराजा जणु क्रोधितच झाला होता, वरुणराजाच्या ह्या विकराळ स्वरूपामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले.

Updated on 17 October, 2021 9:12 PM IST

महाराष्ट्रात ह्या वर्षी पाण्याचे खुप असामान वितरण झालेले आपल्याला दिसत असेल, ह्या वर्षी काही भागात अतिवृष्टी झाली तर काही भागात नेहमी पेक्षा कमी पाऊस झाला पावसाच्या ह्या लहरीपणामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांचेच नुकसान झालेले दिसत आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट-सप्टेंबर ह्या महिन्यात वरुणराजा जणु क्रोधितच झाला होता, वरुणराजाच्या ह्या विकराळ स्वरूपामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान झाले

. शेतकरी मागच्या नुकसानिमधून कसाबसा सावरण्याचा प्रयत्न करत होता की, आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यापुढे पावसामुळे अजून एक संकट उभे राहिले आहे. हे नवीन संकट विदर्भात आले आहे. विदर्भातील चंद्रपूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सोयाबीन, कापूस, तूर आणि कांदा लागवडीचे नुकसान केले आहे. सोयाबीन हे पिक तर पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपूरच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात पावसाळा सप्टेंबरच्या अखेरीस संपतो. या वेळी देखील असेच मानले जात होते. पण आता ऑक्टोबर उलटला तरी पाऊस काही माघार घेण्याचे नाव घेत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान होत आहे.

 विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, गडचांदूर येथे सोयाबीन शेतीचे नुकसान जास्त झाले आहे. सोयाबीनचे पीक हे पावसामुळे सडले आणि त्यामुळे ते काळे पडले आहे.  संपूर्ण जिल्ह्यात सोयाबीनचे पीक हे जवळपास काढणीसाठी पूर्णपणे तयार होते. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्याची काढणी देखील सुरू केली होती. दिवाळीच्या ऐन सणासुदीच्या वेळी सोयाबीनच्या उत्पादनातून चांगला नफा मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती

 काही ठिकाणी सोयाबीन खरेदीही सुरू झाली होती. परंतु ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाच्या हजेरीने जिल्यातील सोयाबीन पिकाचे उत्पादन जवळपास निम्म्यावर आले आहे. आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी राजा हताश झाला आहे आणि आता काय करायचे याची चिंता बळीराजा करत आहे.

 अकोल्यात पांढरे सोनं होत आहे राख!

ह्यावर्षी विदर्भावर वरुणराजा चांगलाच रागावलेला दिसत आहे. चंद्रपूर प्रमाणेच विदर्भातील अकोला जिल्यात देखील अवकाळी पावसाने पार थैमान माजवले आहे. अकोला जिल्ह्यात पावसामुळे कापूस आणि तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी सांगत आहेत की, जिल्ह्यात यंदा तूर आणि कापसाचे पीक चांगले होते, मात्र पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले. 

पावसामुळे कापूस पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. कापुसची बोन्डे तुटून पडले आहेत.  शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, आता सध्याला जिल्ह्यात सोयाबीन पिकाची फक्त 30 टक्के काढणी झाली आहे. त्यामुळे ह्या अवकाळी पावसाने जवळपास 70 टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असावे असे शेतकरी अंदाज बांधत आहेत.

English Summary: in chandrapur district destroy crop unnumrable scathe of farmer
Published on: 17 October 2021, 09:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)