बरेच शेतकरी शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय करण्यास प्राधान्य देतात. यात ग्रामीण भागात मुख्यत्वे पशुपालन हा व्यवसाय केला जातो. पशुपालनासोबत त्यांचे योग्यरीत्या संगोपन करणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. त्यांना आवश्यक असणारे खनिजद्रव्य, खाद्यपदार्थ वेळच्या वेळी दिल्यास त्यांचे आरोग्य निरोगी राहते. मात्र बऱ्याचदा जनावरांना अन्नाद्वारे विषबाधा होते मात्र त्यावरील कारणे आणि उपाय माहित नसल्यामुळे पशूंना जीवही गमवावा लागतो.
आजच्या लेखात आपण जनावरांतील काही महत्वाचे रोग व त्यांवरील उपचारांविषयी जाणून घेणार आहोत. सायनानाईटची विषबाधा, ऑक्झॅालिकची विषबाधा आणि सरकीतून होणारी विषबाधा या विषबाधांचे प्रमाण जास्त आढळते. पशुपालकाकडे योग्य आणि पुरेशी माहिती असल्यास विषबाधा कोणत्या कारणाने होते हे समजेल व ते विषबाधा होऊ नये यासाठी पूर्वनियोजित राहतील.
ज्वारी कापल्यानंतर येणारे फुटवे यामध्ये हायड्रो सायनिक आम्ल या विषारी द्रव्याचे प्रमाण अधिक असते.आणि यातूनच सायनाईटची विषबाधा होते. डोळे लाल होणे हे विषबाधेचे प्रमुख लक्षण आहे. ज्वारीचे फुटवे असलेल्या शेतात जनावरांना चरण्यास सोडू नये. तसेच विषबाधा झालेल्या जनावरांस तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
रब्बी गहू- हरभरा पिकांत वाढणारे 'ढोरकाकडा' नावाचे तण जनावरांनी खाल्ल्यास तसेच काळा बुरशीयुक्त कडबा जनावरांच्या खाण्यात आल्यास ऑक्झॅालिकची विषबाधा होते. या विषबाधेमुळे रक्तात कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊन अडखळत चालणे, कुंथणे, जनावराला पोटफुगी होणे, लघवी थेंबाथेंबाने किंवा अजिबात न होणे. गुदद्वारापासून ते मागील दोन पायांतून अंडकोषापर्यंत सूज आढळून येणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे बुरशीयुक्त कडबा किंवा गहू- हरभऱ्यांतील उपटून टाकलेले तण त्यांच्या आहारात येणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच विषबाधा आटोक्यात आणण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने कॅल्शियमचे इंजेक्शन त्यांना द्यावे.
बैलांना किंवा दुधाळ जनावरांना सरकी देण्यात येते. कीटक प्रतिबंधक असणाऱ्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या कपाशीच्या सरकीमध्ये गॉसीपॅाल नावाचा एक विषारी द्रव्य असतो. हा द्रव्य अधिक प्रमाणात आढळतो. गॉसीपॅालयुक्त सरकी जनावरांच्या सतत खाण्यात आल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी सरकी जनावरांना सतत खाण्यात देऊ नये. समजा चार आठवडे असे खाद्य दिल्यास एखादा आठवडा खाद्य देऊ नये. शेती व्यवसायात पशूंचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे जनावरांच्या स्वास्थ्यबाबत जागृत राहणं गरजेचं आहे.
महत्वाच्या बातम्या;
क्षणात झाले होण्याचे नव्हते, कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात
बातमी कामाची! किडींच्या प्रादुर्भावावर सापडला उपाय, शेतकऱ्यांनो जाणून घ्या
मराठवाड्यावर दुष्काळात तेरावा महिना! आता शेतकऱ्यांनी करायचे तरी काय?
Published on: 24 April 2022, 03:58 IST