News

नाशिक जिल्ह्यात सर्वत्र रब्बी हंगामातील कांदा लागवड (Rabi season onion planting) करण्यासाठी शेतकरी मजूरांची शोधाशोध करताना दिसत आहेत, परिस्थिती एवढी भयाण झाली आहे की, जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मजुरांना वाढीव मजुरी देऊन रात्रपाळीतून कांदा लागवड करायला विवश झाले आहेत. कांदा लागवड करतांना मजुराच्या वादावरून जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे (Onion growers) आपापसात कलह निर्माण झाले आहेत, मजूर आणि शेतकरी यांच्यात देखील वाद पेटताना दिसत आहेत. मजूर टंचाईची परिस्थिती फक्त पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातच उद्भवली आहे असे नाही, तर मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील देखील सध्या अशीच परिस्थिती नजरेला पडत आहे.

Updated on 02 January, 2022 2:33 PM IST

औरंगाबाद जिल्ह्यात सध्या उन्हाळी कांदा लागवड बघायला मिळत आहे, उन्हाळी कांद्याच्या रोपवाटिका तयार झालेल्या असल्याने त्यांची वेळीच पुनर्लागवड होणे महत्त्वाचे आहे, नाहीतर कांद्याच्या रोपवाटिकेतच (In the onion nursery) कांदा पोसायला सुरुवात होईल आणि नंतर त्याची लागवड करणे अशक्य होऊन बसेल. त्यामुळे कांदा लागवड करणारे शेतकरी मोठ्या धर्मयुद्धात सापडले आहेत. एकीकडे लागलीच कांदा लागवड करणे महत्त्वाचे आहे तर दुसरीकडे मजूर मिळत नाहीये म्हणून शेतकरी पूर्णतः विवेचनात सापडलेला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महालगाव व गंगथडी पट्ट्यात उन्हाळी कांदा लागवड (Summer onion planting) यावर्षी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. वास्तविक बघता या परिसरातील बहुतांश शेतकरी कांदा पिकावर अवलंबून असतात. या परिसरातील कांदा एक मुख्य पीक आहे येथील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण (All the finances of the farmers) खांद्यावर येऊन ठेपते. आणि जर मजूरटंचाई अशीच कायम राहिली तर या परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल तसेच शेतकऱ्यांचा सर्व बजेट कोलमडून जाईल असं चित्र नजरेस पडत आहे.

का झाली मजूरटंचाई? (Why the labor shortage?)

औरंगाबाद जिल्ह्यात कधी नव्हे तो चांगला मान्सून बरसला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील विशेषता महालगाव व गंगथडी परिसरात मुबलक पाण्याचा साठा तयार झाला आहे म्हणून येथील बहुतांश शेतकरी उन्हाळी कांदा लागवड करण्याकडे वळले आहेत, उन्हाळी कांद्याच्या रोप वाटिका तयार झालेल्या असल्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांची एकाच वेळी कांदा लागवड करण्याची लगबग बघायला मिळत आहे. तसेच परिसरात कापसाचा हंगाम (Cotton season) शेवटच्या चरणात असल्याने कापूस वेचणीसाठी देखील बहुतांश मजूर अडकलेला आहे या दोन्ही कारणांमुळे परिसरात कांदा लागवडीसाठी मजुर मिळत नाहीयेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी कुणी मजूर देतय का मजूर अशी आर्त हाक मारताना दिसत आहेत.

English Summary: in aurangabad district labor shortage for summer onion cultivation is increased day by day
Published on: 02 January 2022, 02:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)