News

भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताची अर्थव्यवस्था ही पूर्णतः शेतीवर अवलंबून असते. त्यामुळे शेती क्षेत्राला बळकटी देण्याचे कार्य सरकार दरबारी नेहमीच सुरू असते. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध उपाय योजना आखत असतात. अशीच एक उपायोजना विदर्भातील अमरावती जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

Updated on 14 January, 2022 3:55 PM IST

भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताची अर्थव्यवस्था ही पूर्णतः शेतीवर अवलंबून असते. त्यामुळे शेती क्षेत्राला बळकटी देण्याचे कार्य सरकार दरबारी नेहमीच सुरू असते. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध उपाय योजना आखत असतात. अशीच एक उपायोजना  विदर्भातील अमरावती जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

अमरावती जिल्ह्यात आता रोवर मशीन युनिट द्वारे शेतीची मोजणी शक्य होणार आहे. अमरावती जिल्ह्यासाठी गौणखनिज निधीतून भूमिअभिलेख विभागाला 36 लाख 21 हजार 260 रुपयांचा निधी नुकताच देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या भूमिअभिलेख विभागाने रोवर मशीन युनिट व इतर यंत्रणा साठी निधीची मागणी केली होती त्या अनुषंगाने भूमिअभिलेख विभागाला हा निधी वितरित करण्यात आला आहे. भूमिअभिलेख विभागाने या निधीतून रोवर मशीन युनिट लॅपटॉप व प्लॉटर व इतर आवश्यक साहित्य प्राप्त केले आहे. या रोवर मशीन युनिटमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेतजमीन मोजणी सुलभ होणार असे मत व्यक्त केले जात आहे.

रोवर मशीन युनिट मुळे होणारे फायदे

नुकत्याच प्राप्त झालेल्या रोवर मशीन युनिट मुळे भूमिअभिलेख विभागाला मोजणीची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करण्यास मदत होईल यामुळे भूमिअभिलेख विभागाचा तर वेळ वाचेलच शिवाय शेतकऱ्यांचा देखील अनमोल वेळ वाया जाणार नाही. तसेच यामुळे मोजणीच्या कार्यात अजून पारदर्शकता आणण्यास मदत होईल. या रोवर मशीन युनिट मुळे वारंवार होणारे जमिनीचे तंटे निकाली काढण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांची शेतजमीन तसेच एन ए प्लॉट यांच्या मोजणीला या मशीनमुळे गती प्राप्त होईल शिवाय यामुळे मोजणीही पारदर्शकरित्या केली जाऊ शकते व त्यामुळे मोजणीवरून होणारे वादविवाद कायमचे संपतील असे देखील यावेळी तज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे.

काय म्हणाले अमरावतीचे जिल्हाधिकारी

भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीन मुळे गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटप याद्वारे दिल्या जाणाऱ्या भूखंडाची तात्काळ मोजणी करता येणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील वन खंडाची वन हक्क दाव्यांची मोजणी लवकरात लवकर केली जाऊ शकते व यामुळे अनेक प्रकरण निकाली काढता येतील असा विश्‍वास जिल्हाधिकारी नवनीत कोर यांनी यावेळी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील चिखलदरा व अचलपूर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात ही यंत्रणा पुरविण्यात आली आहे.

English Summary: in amravati now farmland calculated through rover machine
Published on: 14 January 2022, 03:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)